बडे मिया छोटे मिया करणार धमाल..अक्षय आणि टायगर पहिल्यांदाच एकत्र | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Akshay Kumar and Tiger Shroff movie 'Bade Miya Chote Miya' will be release on 2023

'Bade Miyan Chote Miyan'करणार धमाल..अक्षय आणि टायगर पहिल्यांदाच एकत्र

बॉलीवूडच्या अॅक्शन फिल्मची तुम्ही गोष्ट करायला गेलेत तर कायम डोळ्यासमोर येऊन उभे राहातात ते अजय देवगण,अक्षय कुमार,हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफ.या अभिनेत्यांच्या अॅक्शन फिल्मला थिएटरच्या बाहेर गर्दी जमली असते.त्यांची फायटिंग बघायला तरूणांची गर्दी जमलेली असते.बॉलीवूडची अजून एक नवी बातमी पुढे येतेय.जी एकून प्रेक्षकांचा आनंद दुप्पट होणार आहे.

अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफच्या येणाऱ्या एका चित्रपटाचा ट्रेलर फेब्रुवारीतच निघाला होता.(Bade Mia Chote Mia)त्यामुळे या दोन दमदार अभिनेत्यांची एन्ट्री चित्रपटात पहिल्यांदाच एकसोबत दिसणार याचा अंदाज आधीच प्रेक्षकांना आला आहे.अत्यंत महागड्या बजेटचा हा चित्रपट असणार आहे अशी चर्चा पुढे येतेय.३०० करोडपेक्षाही जास्त बजेट सांगितल्या जाणाऱ्या या चित्रपटाची प्रेक्षकांमधे तेवढीच मोठी उत्सुकता असणार आहे.या चित्रपटाचा बजेट अक्षय कुमारच्या आतापर्यंतच्या चित्रपटांच्या तुलनेत तीप्पट असल्याचे सांगितल्या जात आहे.'बड़े मियां छोटे मियां' असं या चित्रपटाचं नाव आहे.ज्यामधे अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ सोबत दिसणार आहेत.या चित्रपटाचं निर्देशन अली अब्बास जफर करत आहेत.

या चित्रपटाला बनवण्याचा खर्च जवळपास १२० करोडचा असल्याचे सांगितल्या जात आहे.या चित्रपटाला घेऊन प्रेक्षकांच्या फार अपेक्षा आहेत.तसेच या चित्रपटातील सिन्ससुद्धा अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफची लोकप्रियता लक्षात घेऊन ठरवण्यात आले आहेत.तसेच या चित्रपटातील काही शुटिंग लंडन मधे होणार आहे.चित्रपट आणि फिल्ममेकरचे मानधन जवळपास २१० करोड असणार आहे.त्यानंतर या चित्रपटाचे प्रमोशनही जोरदार होणार आहे.त्यामुळे हा चित्रपट ३५० करोडच्या जवळपास असणार आहे.या चित्रपटाचे प्रदर्शन २०२३ मधे अपेक्षित आहे.

Web Title: Actor Akshay Kumar And Tiger Shroff Are Doing Bade Mia Chite Mia First Time

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top