Ram Setu:चित्रपटाच्या पोस्टरचं काय आता नवं प्रकरण?परत एकदा ट्रोल होतोय अक्षय कुमार

'राम सेतु' या चित्रपटाचं पहिलं पोस्टर रिलीज झालं आहे.त्याच्या पहिल्या पोस्टरने नेटिजन्स मधे खळबळ उडालेली आहे.
Actor Akshay Kumar trolled by his fans on twitter for his new post of Ram Setu Film
Actor Akshay Kumar trolled by his fans on twitter for his new post of Ram Setu Filmesakal

बॉलीवूडमधे हिट,सुपरहिट आणि ब्लॉकबास्टर चित्रपट करणाऱ्या अक्षय कुमारची गीनती कायम पॅक शेड्युल असणाऱ्या अभिनेत्यांमधे केली जाते.त्याच्या दमदार एन्ट्रीसाठी अक्षय कायम चर्चेत असतो.नुकतच त्याच्या राम सेतु या चित्रपटाचं पहिलं पोस्टर रिलीज झालं आहे.त्याच्या पहिल्या पोस्टरने नेटिजन्स मधे खळबळ उडालेली आहे.याआधीही विमल पान मसालाच्या जाहिरातीला घेऊन अक्षयला नेटकऱ्यांच्या ट्रोलींगला सामोरे जावे लागले होते.आता 'राम सेतु' हे परत एक नवं प्रकरण अक्षय कुमारपुढे येऊन ठाकलय.

जॅकलीन फर्नांडिससह नुसरत भरुचा आणि सत्यदेव यांच्यासोबत असलेला 'राम सेतु' या चित्रपटाचं पहिलं पोस्टर नुकतंच अक्षयने त्याच्या ट्वीटर अकाऊंटला शेअर केलंय.ज्यामधे अक्षयने हातात मशाल पकडली आहे तर जॅकलीन हातात टॉर्च घेऊन दिसतेय.त्यामुळे टॉर्च हाती असताना मशालची गरज काय असा प्रश्न नेटकऱ्यांनी उपस्थित केलाय.या पोस्टरवरून अक्षयला परत एकदा सोशल मीडियावर ट्रोल व्हावे लागत आहे.त्याच्या चित्रपटाच्या या पोस्टरला रिपोस्ट करत नेटकऱ्यांना अक्षयला ट्रोल केले आहे.तसेच काहींनी विमल पान मसाला कुमार असे म्हणत अक्षयला चिडवले आहे.

हाती टॉर्च असताना मशाल का जळवली आहे,असे म्हणत नेटकऱ्यांनी पोस्टरमधील मोठी चूक काढून दिली आहे.आणि पोस्टर रिशेअर करत नानाविध कमेंट्स दिल्या आहेत.अक्षयने त्याच्या जाहिरातीच्या वादावर त्याने चाह्त्यांची माफी मागत पुढे अशा जाहिराती न घेण्याचे आवाहन जरी केले असले तरी लोक अजूनही अक्षयला जुन्या जाहिरातीवरून त्याच्या नविन चित्रपटांवर त्याचा परिणाम दिसून येतोय.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com