esakal | अभिनेता अर्जुन कपूरला कोरोनाची लागण; समाजमाध्यमांद्वारे दिली माहिती!
sakal

बोलून बातमी शोधा

अभिनेता अर्जुन कपूरला कोरोनाची लागण; समाजमाध्यमांद्वारे दिली माहिती!

अभिनेता अर्जुन कपूरला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. स्वत: अर्जुनने याबाबत समाजमाध्यमांवर माहिती दिली आहे. डॉक्‍टरांच्या सल्ल्यानुसार त्याच्यावर उपचार सुरू असून, तो होम क्वारंटाईन आहे. 

अभिनेता अर्जुन कपूरला कोरोनाची लागण; समाजमाध्यमांद्वारे दिली माहिती!

sakal_logo
By
संतोष भिंगार्डे

मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून, देशभरात दररोज हजारो रुग्ण आढळून येत आहेत. त्यातच आता अभिनेता अर्जुन कपूरला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. स्वत: अर्जुनने याबाबत समाजमाध्यमांवर माहिती दिली आहे. डॉक्‍टरांच्या सल्ल्यानुसार त्याच्यावर उपचार सुरू असून, तो होम क्वारंटाईन आहे. 

ही बातमी वाचली का? अमिताभ बच्चन यांच्या 'केबीसी १२'चं पुन्हा सुरु होणार शुटींग, सेटवर सुरु आहे अशी जय्यत तयारी

अभिनेता अर्जुन कपूरने समाजमाध्यमांवर प्रसारित केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, ""कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला असून, याबाबत सर्वांना माहिती देणे माझे कर्तव्य आहे. सध्या मला बरे वाटत असून, माझ्यात कोरोनाची कोणतीही लक्षणे दिसून आलेली नाहीत. डॉक्‍टरांच्या सल्ल्यानुसार उपचार घेत असून, स्वतःला होम क्वारंटाईन केले आहे. तुमच्या पाठिंब्याबद्दल सर्वांचे आभार मानतो. 

ही बातमी वाचली का? खोट्या घोड्यावर बसून कोणी झाशीची राणी होत नाही'; कंगनाला शिवसेना नेत्याने मारला टोला

येत्या काही दिवसांत सर्वांना माझ्या आरोग्याविषयी माहिती देत राहीन. हा आपल्या सर्वांसाठीच कठीण काळ आहे. मला विश्‍वास आहे की, आपण सर्व मिळून यावर मात करू. तुम्हाला माझ्याकडून खूप प्रेम, अर्जुन.'' ही पोस्ट समाजमाध्यमांवर प्रसारित होताच सर्वांनी त्याला लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या, तर अनेकांनी त्याला आपली काळजी घेण्याची सूचना केली. 
-------------------------
(संपादन : गोरक्षनाथ ठाकरे)