जगातील सर्वात १०० प्रभावशाली व्यक्तींमध्ये अभिनेता आयुष्यमान खुराणा; टाईम्सच्या यादीत झळकण्याचा मिळाला मान 

युगंधर ताजणे
Wednesday, 23 September 2020

 आपल्या अभिनयाच्या आगळ्या वेगळ्या शैलीने रसिकांवर छाप पाडणा-या आयुष्यमान खुराणाचा समावेश प्रख्यात टाईम्स मासिकात जगातील सर्वात १०० प्रभावशाली व्यक्ती म्हणुन करण्यात आला आहे.

मुंबई -  आपल्या अभिनयाच्या आगळ्या वेगळ्या शैलीने रसिकांवर छाप पाडणा-या आयुष्यमान खुराणाचा समावेश प्रख्यात टाईम्स मासिकात जगातील सर्वात १०० प्रभावशाली व्यक्ती म्हणुन करण्यात आला आहे. त्याच्यावर झालेल्या या कौतुकाच्या निमित्ताने भारतीयांच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.
 याशिवाय आणखी ३ भारतीयांचा समावेश यादीत करण्यात आला आहे. त्यात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई, युकेस्थित असणारे भारतीय वंशाचे डाँ. रविंद्र गुप्ता आणि शाहिनबाग फेम बिलखीस आजी यांनाही हा बहुमान प्राप्त झाला आहे. 

अनुराग कश्यपवर पायल घोषने केला बलात्काराचा आरोप, तक्रार दाखल - 

 अंधाधुन, आर्टीकल ५० यासारख्या चिञपटांच्या माध्यमातुन चर्चेत आलेल्या आयुषमानचा स्वतंञ चाहतावर्ग आहे. विशेष म्हणजे आयुषमानचे ८ चिञपट बाँक्सआँफिसवर हिट झाले आहेत. कधी विनोदी, कधी गंभीर, तर अनेकदा हलक्या फुलक्या भुमिकेतुन रसिकांचे मनोरंजन करणा-या आयुषमानला समाजाला आपल्या अभिनयातुन अधिक सुजाण करावेसे वाटते. तो सांगतो, समाजात बदल घडवुन आणण्याची ताकद सिनेमा माध्यमात आहे. हे माध्यम आपण अधिक सखोलपणे समजावुन घेण्याची गरज आहे. या माध्यमाव्दारे मला रसिकांना आनंद देता आला याचे विशेष समाधान आहे. 

अभिनेत्री श्रद्धा कपूरच्या अडचणींमध्ये वाढ, जया साहाने एनसीबीसमोर दिली कबुली - 

 टाईम्सच्या यादीत जागतिक स्तरावरील अनेक कलाकार आहेत. यात सेलेना गोमेझ, आँस्कर विजेते दिग्दर्शक बोंग जुन हो, फिलेबँग फेम आँफ फोबे वाँलर – ब्रीज आणि मिचेला कोल या ब्रिटिश अभिनेञीचा समावेश आहे

---------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Actor Ayushyaman Khurana among 100 most influential people in the world