'आम्ही बंड केलं की आई...' अभिनेता हेमंत ढोमेचं खुमासदार ट्विट..

हेमंत ढोमे याने एकनाथ शिंदे यांच्या बंडाबाबत उपरोधिक आणि खुमासदार ट्विट केले आहे.
marathi actor hemant dhome tweet on eknath shinde revolt against mahavikas aghadi and shivsena
marathi actor hemant dhome tweet on eknath shinde revolt against mahavikas aghadi and shivsena sakal

hemant dhome : अभिनेता, लेखक आणि दिग्दर्शक हेमंत ढोमे याचा झिम्मा चित्रपट नुकताच येऊन गेला. या चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. हेमंत एक संवेदनशील कलाकार आहे. तो सोशल मीडिया वर बराच सक्रिय असतो. आजूबाजूला घडणाऱ्या सामाजिक, राजकीय परिस्थितीवर कायमच भाष्य करत असतो. असेच एक ट्विट त्याने नुकतेच केले आहे. गेली दोन दिवस महाराष्ट्रात चाललेल्या अराजकतेवर त्याने खुमासदार भाष्य केले आहे. (marathi actor hemant dhome tweet on eknath shinde revolt against mahavikas aghadi and shivsena) (eknath shinde revolt)

marathi actor hemant dhome tweet on eknath shinde revolt against mahavikas aghadi and shivsena
'महाविकास आघाडीची वेळ संपत आलीय', आरोह वेलणकरणचा पुन्हा ट्विट बॉम्ब..

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यामुळे महाविकास आघाडी सरकार चांगलीच अडचणीत आली आहे. एकनाथ शिंदे यांची वाट पुन्हा शिवसेनेकडे वळवण्यासाठी अनेक प्रयत्न सुरू आहेत परंतु एकनाथ यांची बाजू अधिकच भक्कम होत चालली आहे. काल पर्यंत ३३ आमदारांचा पाठिंबा असणारे शिंदे एका रात्रीत ४० आमदारांना घेऊन गुवाहाटी येथे रवाना झाले. विशेष म्हणजे त्यांनी रस्ते मार्गाने सूरत गाठले खरे पण तिथून पुढे थेट खासगी विमान करून त्यांनी 40 आमदारांसह गुवाहाटी गाठली. त्यानंतर शिंदे यांनी सेनेपूढे तीन मागण्या ठेवल्या आहेत. शिवाय त्यांच्याकडे मोठा पाठिंबा असल्याने सेनेची चांगलीच कोंडी झाली आहे. आता तर शिंदे यांनी आणखी एक गौप्यस्फोट केला आहे. आज रात्री पर्यंत ५० आमदार माझ्या बाजूने असतील अशी खात्री शिंदे यांनी माध्यमांना दिली आहे. या बंडावर अभिनेता आरोह वेलणकर पाठोपाठ आता हेमंत ढोमे यानेही भाष्य केले आहे.

“आम्ही बंड केलं की आई कालथ्याने चटका द्यायची! पण ती तेव्हा प्रायवेट विमानाने डायरेक्ट गुवाहाटी ला घेऊन गेली असती तर आज आमची आयुष्यं वेगळी असती…काय म्हणता?” असे उपरोधिक ट्विट हेमंतने केले आहे. सध्या त्याचे ही ट्विट चांगलेच चर्चेत आहे. शिवाय या बंडाचे पुढे काय होणार, सरकार पडणार का याबाबतही उभ्या महाराष्ट्राचे लक्ष राजकीय घडामोडींकडे लागले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com