अभिनेता पंकज त्रिपाठी म्हणतो, खादी घ्या खादी..;  पण का..? वाचा सविस्तर..

सकाळ न्यूज नेटवर्क
Tuesday, 23 June 2020

आता त्याची नियुक्ती बिहारमधील पाटणा येथील खादी मॉलचा ब्रॅण्ड अॅम्बेसेडर म्हणून करण्यात आली आहे. खादी ग्रामोद्योगाला चालना देण्यासाठी आता तो झटणार  आहे.

मुंबई : गँग्ज ऑफ वासेपूर, फुकरे, न्यूटन, सुपर ३० अशा कित्येक हिंदी चित्रपटामध्ये विविध भूमिका पंकज त्रिपाठीने केल्या आहेत आणि आपले अभिनयकौशल्य अनेक चित्रपटांतून दाखविले आहे. नकारात्मक भूमिकांबरोबरच काहीशा विनोदी ढंगाने जाणाऱ्या तसेच चरित्र भूमिकांतूनही तो भाव खाऊन गेला आहे. 

सर्वात मोठी बातमी - चीनी हॅकर्सकडून 5 दिवसात 40 हजार सायबर हल्ले...

आता त्याची नियुक्ती बिहारमधील पाटणा येथील खादी मॉलचा ब्रॅण्ड अॅम्बेसेडर म्हणून करण्यात आली आहे. खादी ग्रामोद्योगाला चालना देण्यासाठी आता तो झटणार  आहे. तो म्हणाला, की मला बिहारच्या उद्योग मंत्रालयातून फोन आला. त्यांनी माझ्यासमोर अशा प्रकारचा प्रस्ताव ठेवला. तेथील अधिकारी मी थिएटर करीत असताना मला ओळखत होते. 

...कायद्याचे उल्लंघन झाल्यास जबाबदारी तुमची; फडणवीस यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

लहान असताना मी माझ्या वडिलांबरोबर या खादी भांडारमध्ये कपडे घेण्यास जात असे. त्यामुळे आता त्याचाच ब्रॅण्ड अॅम्बेसेडर होण्याची ऑफर आली तर ती मी नाकारू शकत नव्हतो. मी आता ब्रॅण्ड अॅम्बेसेडर जरी झालो असलो तरी खादी आपल्याकडे पूर्वीपासून खूप प्रसिद्ध आहे आणि तिला अधिक प्रसिद्धीची गरज आहे असे मला वाटत नाही. खादी हे वस्त्र नसून ती एक विचारधारा आहे आणि ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेला चालना देणारी आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: actor pankaj tripathi became brand ambassador of bihar khadi dept