Puneeth Rajkumar : पुनित राजकुमार 'कर्नाटकरत्न'; राज्य सरकारकडून होणार मरणोत्तर गौरव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Puneeth Rajkumar

पुनित राजकुमार 'कर्नाटकरत्न'; राज्य सरकारकडून होणार मरणोत्तर गौरव

बंगळुरु : दिवंगत साऊथ सुपरस्टार पुनित राजकुमार याला कर्नाटक राज्य सरकारचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कर्नाटकरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. राजकुमार याचं साऊथ फिल्म इंडस्ट्रीसोबतच सामाजिक कार्यातही मोठं योगदान आहे. त्याच्या या कार्याचा गौरव कर्नाटक सरकारकडून करण्यात येणार आहे. त्यानुसार १ नोव्हेंबर रोजी मरणोत्तर कर्नाटकरत्नने गौरवण्यात येणार आहे. (Actor Puneeth Rajkumar to be awarded Karnataka Ratna)

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या हस्ते स्वातंत्र्यदिनानिमित्त फुलांच्या प्रदर्शनाचं उद्घाटनं पार पडलं. यावेळी आयोजित कार्यक्रमात बोलताना त्यांनी ही घोषणा केली. बोम्मई म्हणाले, "आम्ही कन्नड फिल्म स्टार डॉ. पुनित राजकुमार यांना कर्नाटकरत्न देण्याचा निर्णय घेतला आहे. १ नोव्हेंबर रोजी त्यांना मरणोत्तर हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल"

हेही वाचा: आरे कारशेड विरोधात प्रकाश आंबेडकरांचा इशारा; 'वंचित' उतरणार रस्त्यावर

कर्नाटकरत्न पुरस्कारासाठी एक समिती नेमण्यात आली असून यामध्ये डॉ. पुनित राजकुमार यांच्या कुटुंबियांचा देखील समावेश असेल. या समितीतील सर्वजण मिळून सर्वाधिक प्रतिष्ठेचा कर्नाटकरत्न पुरस्कार पुनित यांना प्रदान करु, असंही बोम्मई यांनी यावेळी सांगितलं. हा पुरस्कार मिळवणारा पुनित हा १० वा मान्यवर व्यक्ती ठरणार आहे.

हेही वाचा: "हा तर रामभक्तांचा अपमान"; काँग्रेसच्या आंदोलनावर भडकले योगी आदित्यनाथ

पुनित राजकुमारचा गेल्यावर्षी २९ ऑक्टोबर रोजी कार्डियाक अॅऱेस्टमुळं मृत्यू झाला होता. अवघ्या ४६ व्या वर्षी या प्रतिभावान अभिनेत्याचा मृत्यू झाल्यानं भारतातील सर्वच चित्रपटश्रृष्टींमधून हळहळ व्यक्त करण्यात आली होती. पुनित राजकुमारला अप्पू या टोपण नावानं ओळखलं जायचं. तो अभिनेता, पार्श्वगायक, टिव्ही अँकर आणि निर्माता होता.

Web Title: Actor Puneeth Rajkumar To Be Awarded Karnataka Ratna

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..