Leak Video: श्रद्धा आणि रणबीरचा डान्स व्हिडिओ लिक..चित्रपटाचं नाव मात्र हाईड

या व्हिडिओमधे एका गाण्याची शूटिंग चाललेली दिसते.
Actor Ranbir Shared his Untitled Movie scene video on instagram
Actor Ranbir Shared his Untitled Movie scene video on instagramesakal

मागल्या काही काळात श्रद्धाच्या(Shraddha Kapoor) चित्रपटांतील दिर्घकाळाच्या ब्रेकनं श्रद्धा चर्चेत आली होती.श्रद्धाला काही मुलाखतींत याबाबत प्रश्नही करण्यात आले होते.मात्र आता श्रद्धाचा शूटिंग सेटवरील एक व्हिडिओ चांगलाच चर्चेत येत आहे.या व्हिडिओमधे एका गाण्याची शूटिंग चाललेली दिसते.श्रद्धा पिवळ्या रंगाच्या शॉर्ट ड्रेसमधे उभी डान्स स्टेप शिकताना दिसतेय.

डान्स कोरीयोग्राफर श्रद्धाला डान्स स्टेप शिकवताना या व्हिडिओमधे दिसतेय.(Luv Ranjan)लव रंजनच्या येत्या चित्रपटाचं नाव जरी पुढे आलं नसलं तरी सोशल मीडियावर या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे.(Ranbir Kapoor)हा अनटायटल चित्रपट रोमँटिक असल्याची चर्चा आहे.त्यामुळे चर्चेत असलेल्या या चित्रपटाची वाट निश्चितच प्रेक्षकांना आहे.(audience)चित्रपटातील एका डान्स शॉटचा व्हिडिओ रणबीरच्या फॅनपेजने इन्स्टाग्राम अकाऊंटवर टाकलाय.त्यामुळे आता येणाऱ्या चित्रपटाच्या नावाचीही तेवढीच उत्सुकता सगळ्यांना लागली आहे.

रणबीर आणि श्रद्धा कपूर लव रंजनच्या या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.त्यांच्याबरोबर डिंपल कपाडियाची(Dimple Kapadia) झलकही या चित्रपटात प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे.आणखी एक खास म्हणजे बोनी कपूरचा अॅक्टिंग डेब्यू प्रेक्षकांना या चित्रपटात बघायला मिळणार आहे.

Actor Ranbir Shared his Untitled Movie scene video on instagram
Sridevi-Boney Kapoor Anniversary: पाहता क्षणी प्रेमात अन् प्रेमासाठी पाठलाग, या जोडप्याची लव स्टोरी फारच खास

बोनी कपूर त्यांच्या काही फिल्म प्रोडक्शनमुळे व्यस्त होते.त्यामुळे खरं तर त्यांना या चित्रपटात काम करण्याची इच्छा नव्हतीच.(Boney Kapoor)चित्रपटाची स्क्रिप्ट लिहिली जात असताना लव रंजनने रणबीरच्या वडिलांच्या रोलसाठी बोनी कपूरची निवड केली होती.बोनी कपूरचा मुलगा अर्जून कपूरच्या हट्टापोटी अखेर बोनी कपूर यांनी या चित्रपटातील रणबीरच्या वडिलांच्या भूमिकेसाठी होकार दिला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com