Ranveer's Comment on Mouni:ग्लोबल वॉर्मिंगला मौनीचा हॉटनेस जबाबदार, रणबीरचं आगळ वेगळं निरिक्षण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Actor Ranveer Singh's Comment on Mouni Roy's Hotness

'ग्लोबल वॉर्मिंगला मौनीचा हॉटनेस जबाबदार', रणवीरचं आगळं वेगळं निरिक्षण

प्रसिद्ध अभिनेता रणवीर सिंग त्याच्या आगळ्यावेगळ्या गोष्टींसाठी कायम चर्चेत असतो.कधी त्याच्या धमाकेदार अॅक्टींगने तर कधी त्याच्या स्टाईलचे प्रेक्षक दिवाने होतात.सध्या त्याच्या जयेशभाई जोरदार या चित्रपटासाठी हा अभिनेता चर्चेत आहे.सध्या रणवीर त्याच्या चित्रपटाच्या प्रमोशन मधे व्यस्त आहे.प्रमोशनसाठी अलीकडे रणवीर डास इंडिया डान्स लिटील मास्टर शो मधे आला होता.यावेळी मौनीची सुंदरता बघून रणवीरने फ्लर्ट करायला सुरूवात केली.

सोनाली बेंद्रे.रेमो डिसुजा आणि मोनी रॉय या डीआईजी लिटिल मास्टर शो च्या जज आहेत.ज्यामधे लहान मुलांच्या टॅलेंटचा अनोखा अंदाज तुम्हाला बघायला मिळेल.शो मधील मस्ती मजाक करतानाचे काही फोटोज आणि व्हिडिओज रणवीरने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीला टाकले आहेत.सोनाली बेंद्रे सोबतचाही एक छोटासा व्हिडिओ त्याने स्टोरीवर टाकलाय.

गर्मी एवढी वाढली आहे की हिट वेवचा तडाखा सगळ्यांना बसतोय.गमती गमतीत रणवीरने 'कुछ तो रेहेम करो,देश मे हॉट वेव चल रही है' असे म्हणत अगर गर्मी बढ गयी तो मै पुरी तयारी के साथ आया हू म्हणाला.त्यानंतर लगेच रणवीर त्याच्या जवळचं फायर प्रोटेक्ट किट दाखवतो.या व्हिडिओच्या कॅप्शनमधे त्याने 'ग्लोबल वार्मिंचं खरं कारण आहे मौनी'.असे म्हटले आहे.

रणवीरच्या 'जयेशभाई जोरदार' या चित्रपटाचे सध्या जोरदार प्रमोशन सुरू आहे.या चित्रपटाची निर्मिती यशराज फिल्मच्या बॅनर अंतर्गत बनवल्या गेली आहे.या चित्रपटाचं प्रदर्शन १३ मे ला जगभरातील चित्रपटगृहांमधे होणार आहे.

Web Title: Actor Ranveer Singh Comment On Mouni Roys Hotness At Didj Little

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top