Rambo:टायगरनं रॅम्बोची घोषणा केल्यावर नाराज झाला रणवीर, कारण... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Actor Ranveer Singh reveals that he was upset when Tiger Shroff announced Rambo

टायगरनं रॅम्बोची घोषणा केल्यावर नाराज झाला रणवीर, कारण...

रणवीर सिंग हा अभिनेता सध्या त्याच्या जयेशभाई जोरदार या चित्रपटाच्या प्रमोशनमधे व्यस्त आहे.रणवीरचा हा चित्रपट येत्या १३ ला सिनेमाघरांत प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.या चित्रपटाच्या रिलीजच्या शुभमुहूर्ताच्या आधीच या चित्रपटासाठी रणवीरला अनेक अडचणींना सामोरे जावे लागले.आता मात्र या सगळ्यातून मार्ग काढत रणवीरचा सिनेमा १३मे ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

अशातच टायगरने केलेल्या अनाऊंसमेंटमुळे मात्र रणवीरने नाराजी व्यक्त केली आहे.खरं तर रणवीरला अॅक्टर होण्याआधी हिरो व्हायचे होते.असे रणवीर म्हणाला होता.त्यासाठी त्याने अॅर्नॉल्ड स्कॅवरझेनर (Arnold Schwarzenegger)आणि सील्वेस्टर (Sylvester Stallone) बघायला सुरूवात केली.हे सगळे त्यावेळी माझे जीग्री झाले होते.(Tiger Shroff)मी त्यांना स्क्रीनवर बघायचो.रॅम्बो,रॉकी,कमांडो या चित्रपटांवर त्याचे प्रेम होते.त्याला यांसारखे चित्रपट फार आवडायचे.हे माझे हिरो होते.हेच मला हवं होतं.त्यामुळे मला वाईट वाटलं जेव्हा रॅम्बो हा चित्रपट टायगर करतोय असे मी ऐकले.त्यावेळी मला असं वाटलं हे तर मला करायचं होतं.

हेही वाचा: Tiger Shroff |टायगर श्रॉफच्या फिटनेस ट्रेनरचं निधन

रॅम्बो या चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर हा चित्रपट १९८२ च्या हिंदी चित्रपटाचं रिमेक असणार आहे.रोहित धवन या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहेत.टायगरने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर रोम्बोचे पहिले पोस्टर शेअर केले आहे.मात्र त्याच्या या पोस्टरने रणवीरला नाराज केलेले दिसते.रणवीरचा जयेशभाई जोरदार या चित्रपटाव्यतिरीक्त त्याचे बरेच चित्रपट लाईनमधे आहेत.तो त्याच्या पुढील सर्कस या चित्रपटात दिसणार आहे.या चित्रपटात रणवीरसोबत जॅकलीन,पूजा हेगडे दिसणार आहेत.

Web Title: Actor Ranveer Singh Revealed That He Was Upset When Tiger Posted For Rambo

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top