दिल्लीतील शपथविधी वादावर अभिनेता रितेश देशमुखची प्रतिक्रिया ठरतेय चर्चेचा विषय..

riteish deshmukh
riteish deshmukh

मुंबई- राज्यसभा सदस्यांच्या शपथविधीवेळी दिल्लीत जी घटना घडली त्याचे पडसाद सगळीकडे उमटताना दिसतायेत. भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी राज्यसभेच्या खासदारकीची शपथ घेताना शेवटी 'जय भवानी जय शिवाजी' अशी घोषणा दिली होती. मात्र यावर उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी शपथविधीवेळी केलेल्या या शिवाजी महाराजांच्या घोषणेला विरोध करत उदयनराजे यांना चांगलीच समज दिली. या प्रकरणानंतर भाजप आणि व्यंकय्या नायडू यांच्याविरोधात जोरदार टिका होताना दिसतेय. 

दिल्लीतील या शपथविधी दरम्यानच्या घटनेचे हे पडसाद आता सर्व स्तरांतून उमटत आहेत. त्यातंच अभिनेता रितेश देशमुखने देखील यावर त्याची प्रतिक्रिया दिली आहे. रितेशची ही प्रतिक्रिया म्हणजे 'समझने वालों को इशारा काफीं है' या म्हणीला साजेशी आहे. अभिनेता रितेश देशमुखने छत्रपती शिवाजी महाराज यांचा एक फोटो पोस्ट करत लिहिलंय, जय भवानी, जय शिवाजी.. जय जिजाऊ, जय शिवराय असं कॅप्शन दिलं आहे. दिल्लीत आधीच वातावरण तंग असताना रितेशची ही प्रतिक्रिया आणखी चर्चेचा विषय ठरली आहे. 

उदयनराजे यांनी वादावर काय दिली प्रतिक्रिया?

'रेकॉर्डवर केवळ शपथ जाईल असं सभापतींनी सांगितलं. त्याच्यावर आता बरेच वाद होत आहेत. शिवाजी महाराजांच्या नावावर खूप राजकारण झाले आहे. महाराजांचा अपमान झाला असता तर मी गप्प बसणा-यातला नाही. तिथेच सरळ राजीनामा दिला असता.' असं म्हणत उदयनराजे यांची त्यांची भूमिका मांडली. 

उदयनराजे यांनी काँग्रेसवर केला आरोप

'ज्यांनी आक्षेप घेतला ते नेते काँग्रेस की राष्ट्रवादीचे हे मला माहित नाहीत. जे घडलं नाही ते भासवण्याचा प्रयत्न करु नका ही माझी विनंती आहे. काँग्रेसच्या सदस्यांनी का आक्षेप घेतला हे मला विचारण्याऐवजी राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेनेला विचारा. आक्षेप घेताना राज्यघटनेचा आधार घेतला. नायडू यांनी चुकीचं केलं नाही' असं उदयनराजेंनी म्हटलं आहे.   

actor riteish deshmukh reaction on udayanraje bhosale venkaiah naidu controversy  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com