Shahrukh Khan:शाहरूख ठरला फ्रान्सच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराचा मानकरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shahrukh Khan honored by France Highest Civilian Award

शाहरूख ठरला फ्रान्सच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराचा मानकरी

एव्हरग्रीन अभिनेत्याची प्रचिती मिळालेला शाहरूख खान कायम चर्चेत असतोच यात काही वाद नाही.त्याच्या बीग बजेट चित्रपटांसाठीही तो कायम चर्चेत असतो.सध्या मात्र त्याला मिळालेल्या फ्रान्सच्या सर्वोच्च नागरी पुरस्कारासाठी तो चर्चेत आलाय.या निमित्ताने मन्नतमधे एका जंगी पार्टीचे आयोजनही झालेले दिसते.

शाहरूखने 'मन्नत' म्हणजेच त्याच्या निवासस्थानी आयोजित केलेल्या पार्टीमधे परदेशातील काही खास पाहुण्यांनी हजेरी लावली आहे.या पार्टीमध्ये फ्रान्स, कॅनडा तसेच इतर देशांमधील राजदूत उपस्थित होते.(Bollywood)या पार्टीमधील फोटो सध्या सोशल मीडियावर वायरल होत आहेत.त्यांच्यासोबतचा एक ग्रुप फोटो सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे.

फ्रान्सचे भारतीय राजदूत 'Mr. Jean-Marc Séré-Charlet' यांनी मन्नतमधे पार पडलेल्या पार्टीनंतर एक ट्विट करत शाहरुखचं कौतुक केलं आहे.“फ्रान्सचा सर्वोच्च नागरी पुरस्कार शाहरुख खानला देणं अगदी योग्य आहे. शाहरुख तू दिलेल्या पार्टीबद्दल तुझे मनापासून आभार.” अशाप्रकारचं ट्वीट करत शाहरूखसोबतचा एक फोटो ट्वीटरवर शेअर केलाय.

शाहरूखला हा पुरस्कार मिळण्याचं कारण ?

फक्त भारतातच नव्हे तर संपूर्ण जगामध्ये सांस्कृतिक दृष्ट्या शाहरुखने दिलेल्या योगदानासाठी त्याला या पुरस्काराने गौरवण्यात आलं. कॅनडाचे भारतातील राजदूत 'Diedrah Kelly'यांनी देखील ट्वीट करत शाहरुखचं कौतुक केलेलं दिसते.३ मे रोजी ताजमहाल पॅलेस या हॉटेलमध्ये शाहरुखला या पुरस्काराने गौरवण्यात आलं.

Web Title: Actor Shahrukh Khan Honored By France Highest Civilian

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top