Shahrukh Khan:किंग खान '१०० सिगारेट अन ३० कप कॉफी' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Actor Shahrukh khan reveals his addiction for coffee and sigaret

किंग खान '१०० सिगारेट अनं ३० कप कॉफी'

बॉलीवूडचा किंग खान नेहमी त्याच्या चित्रपटांसाठी बीग बजेट फिल्मसाठी ओळखल्या जातो.त्यासाठी तो सतत चर्चेतही असतो.'शाहरूख त्याच्या आयुष्यात आलिशान जीवन जगतो आणि फिट अँड फाईन असतो' असे त्याच्या चाहत्यांचा समज आहे.पण मात्र त्याच्या जीवनातल्या काही गोष्टी ऐकून तुम्हालाही धक्का बसेल.

काही वर्षांपूर्वीच्या एका मुलाखतीमधे त्याला सिगारेटचे व्यसन असल्याचे त्याने उघडपणे सांगितले.२०११ मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत शाहरुखने स्वत:ची ही वाईट सवय सांगत हा खुलासा केला होता.(Bollywood)शाहरूख दिवसाला १०० सिगारेट पीतो आणि सुमारे ३० कप ब्लॅक कॉफी पितो असे त्याने स्वत: कबूल केले होते.यावेळी त्याने त्याच्या खाण्यावर असलेल्या प्रेमाविषयी सांगितले होते.शाहरूखच्या वडिलांचे दिल्लीत रेस्टॉरेंट होते.(Interview)पठाणी जेवण हे या रेस्टॉरेंटमधील विशेष जेवण होते.तर शाहरूखची आई 'हैद्राबादी' जेवण चविष्ठ बनवायची.शाहरूखची आई जीवंत असेपर्यंत त्याला रोज तीच्या हाताने जेवण भरवायची.

याच मुलाखतीत शाहरूखने त्याच्या आहाराबद्दल सांगताना त्याच्या सिगारेटच्या व्यसनाविषयीचा खुलासा केला होता."मी जवळपास १०० सिगारेट पितो.त्यामुळे कधी कधी तो जेवायलाही विसरतो.तसेच तो असेही म्हणाला होता.कधी तर मला शूटिंगदरम्यान आठवतं की मी जेवायला हवं.मी पाणि अतिशय कमी पितो.दिवसातून ३० कप मी कॉफी पितो."असे तो म्हणाला होता.

शाहरूख हा त्याच्या झिरो चित्रपटानंतर सध्या तरी कुठल्या चित्रपटात झळकला नाही.अलीकडेच शाहरूखला 'फ्रान्सचा सर्वोच्च नागरी पुरस्काराने' सन्मानित करण्यात आलं आहे.

Web Title: Actor Shahrukh Khan Revealed His Addiction For Sigaret And Black

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top