सगळे म्हणाले होते तू अशा चित्रपटांमध्ये काम करु नकोस, पण..

सकाळ ऑनलाईन टीम
Friday, 4 December 2020

शर्मननं त्याची एक स्टोरी नुकतीच एका वृत्तवाहिनीला शेयर केली आहे. त्यात त्यानं त्याला आलेल्या वेगवेगळया अनुभवाविषयी सांगितले आहे.

मुंबई - प्रत्येकाचा लक फॅक्टर वेगळा असतो. कुणा कलाकाराला कुठल्या चित्रपटाच्या माध्यमातून यशाची शिडी मिळेल हे सांगता येत नाही. वेगवेगळ्या प्रकारच्या अपयशाला सामोरं गेल्यानंतर यशाची चव चाखता येतेच असं नाही. अशा प्रसंगातून प्रत्येक कलाकाराला जावे लागते. प्रसिध्द अभिनेता शर्मन जोशीच्या बाबतीतही असाच काहीसं घडलं होतं. त्यावेळी त्यानं जो निर्णय घेतला होता त्याला त्याच्या परिवारासकट सगळ्यांनीच विरोध केला होता.

शर्मननं त्याची एक स्टोरी नुकतीच एका वृत्तवाहिनीला शेयर केली आहे. त्यात त्यानं त्याला आलेल्या वेगवेगळया अनुभवाविषयी सांगितले आहे. ज्यावेळी त्याला 'हेट स्टोरी' चित्रपटाती ऑफर आली होती त्यावेळी त्यानं बराचकाळापासून विचार केला. कारण तो चित्रपट भलताच बोल्ड होता. त्यातील सीनही एकदम हॉट होते. मात्र त्यात काम करताना काय करावं असा प्रश्न त्याला पडला होता. हेट स्टोरीचा विषयच असा होता की त्याला कुणाशी कशी चर्चा करावी हे सुचेनासे झाले होते. हेट स्टोरी या चित्रपट मालिकेलीत तिस-या भागाला पाच वर्षे पूर्ण झाली आहेत. ही  या चित्रपटात अभिनेता शर्मन जोशी याने मुख्य व्यक्तिरेखा साकारली होती. मात्र या चित्रपटामुळे त्याला टीकेला सामोरं जावं लागलं होतं.

कलावंत झाले 'राजकीय'; चित्रपट क्षेत्रातील कलाकार जेव्हा होतात 'नेते'

शर्मननं इ टाईम्सला मुलाखत दिली होती. त्यावेळी त्यानं हेट स्टोरी 3 विषयी सांगितले तो म्हणाला,  आजवर मी अशा प्रकारच्या जॉनरमध्ये कधीही काम केलेलं नव्हतं त्यामुळे मी होकार दिला. मी एरॉटिक जॉनरमध्ये देखील यशस्वी होऊ शकतो का? हे मला पाहायचं होतं. अर्थात या चित्रपटात खूप जास्त बोल्ड सीन होते. पण या चित्रपटानं मला एक वेगळा अनुभव दिला. कदाचित पुन्हा मी अशा प्रकारच्या चित्रपटांमध्ये काम करणार नाही“माझे मित्रमंडळी, कुटुंबीय आणि चाहत्यांनी देखील या चित्रपटात काम न करण्याचा सल्ला मला दिला होता. परंतु या चित्रपटाची पटकथा मला आवडली होती.

हे ही वाचा: कंगनाने सोशल मिडियावर हिमांशी खुरानाला केलं ब्लॉक  

गोलमाल, रंग दे बसंती, थ्री इडियट,  मिशन मंगल यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्याचा मोठा फॅन फॉलोअर्स आहे. सुपरहिट चित्रपटांमध्ये त्यानं काम केलं आहे. या पार्श्वभूमीवर त्याने एखाद्या एरॉटिक चित्रपटात काम करु नये अशी इच्छा चाहत्यांनी व्यक्त केली होती. तरी देखील त्याने हेट स्टोरीमध्ये काम केलं. या चित्रपटात त्याने काही बोल्ड सीन देखील दिले आहेत 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: actor Sharman joshi share experience hate story movie hot scene family controversy