

मुंबई - अश्लील व्हिडिओ बनवणे आणि ते शेयर करणे याप्रकरणी प्रसिद्ध उद्योगपती आणि प्रख्यात अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला मुंबई पोलिसांनी अटक केली होती. त्या पॉर्नोग्राफी प्रकऱणात राजवर वेगवेगळ्या प्रकारचे आरोप झाले होते. त्यावेळी राजच्या चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या शर्लिन चोप्रा, पूनम पांडे यांनी राजच्या विरोधात पोलिसांकडे तक्रार दिली होती. त्यानं आपल्याला त्याच्या चित्रपटामध्ये काम करण्यास सांगितले होते. त्यास नकार दिला तर बदनामी करण्याची धमकी दिल्याचे शर्लिननं पोलिसांना तपासणीच्या वेळी सांगितले होते. यानंतर शिल्पा शेट्टीच्या डोकेदुखीत आणखी वाढ झाली होती. कारण राजला तेव्हा जामीनासाठी तीनदा अर्ज करुनही तो मिळाला नव्हता. पुनम पांडे आणि शर्लिन चोप्रा यांनी आपल्या विरोधात सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात बदनामी केल्याचा आरोप आता शिल्पानं केला आहे.
एएनआयनं दिलेल्या माहितीनुसार आता शिल्पा आणि तिचा पती राज कुंद्रा यांनी शर्लिन चोप्रा वर 50 कोटींचा मानहानी केल्याचा दावा ठोकला आहे. त्यामुळे या दाव्यावर येत्या दिवसांत शर्लिन काय करणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. राज जेलमध्ये असताना शर्लिननं सोशल मीडियाच्या आधारे वेगवेगळ्या प्रकारची वक्तव्ये करुन त्या प्रकरणाला आणखी फोडणी दिली होती. तिनंच आपल्याला पोलिसांनी चौकशीसाठी बोलावले राजविषयी चौकशी केल्याचेही सांगितले होते. तसेच शिल्पा शेट्टी आणि तिच्या कुटूंबियांवरही शर्लिननं काही आरोप केले होते. शिल्पाला तिच्या घरात खरचं काय चालले आहे आणि तिचा पती काय करतो हे तिला माहिती नाही का, असा प्रश्न तेव्हा शर्लिननं शिल्पाला विचारला होता.
राजच्या पॉर्नोग्राफी प्रकरणानं तेव्हा बॉलीवूडमध्ये खळबळ उडाली होती. त्या प्रकरणानं अनेकांचं लक्ष वेधून घेतलं होतं. त्यामुळे शिल्पाला ती सहभागी असलेल्या काही रियॅलिटी शो मधून माघार घ्यावी लागली होती. तसेच तिला मोठ्या प्रमाणात ट्रोलिंगलाही सामोरं जावं लागलं होतं. दरम्यानच्या काळात सोशल मीडियावर आपली आणि पती राज कुंद्राची बदनामी झाल्याचा आरोप शिल्पानं केला आहे. त्यामुळे तिनं आता शर्लिनच्या विरोधात मानहानीचा दावा ठोकला आहे. राज आणि शिल्पाच्या विरोधात शर्लिननं पोलिसांकडे तक्रार दिली होती. त्यात असा उल्लेख होता की, राज आणि शिल्पानं आपला शाररिक आणि मानसिक छळ केला होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.