Shreyas Talpade : 'ECG हा सर्वात मोठा जोक आहे'... श्रेयस तळपदे असं का म्हणाला

14 डिसेंबर रोजी श्रेयसला हृदयविकाराचा झटका आला होता.
Shreyas Talpade : 'ECG हा सर्वात मोठा जोक आहे'... श्रेयस तळपदे असं का म्हणाला

बॉलिवूड अभिनेता श्रेयस तळपदेसाठी 2023 हे वर्ष कठीण गेले आहे. 14 डिसेंबर रोजी श्रेयसला हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर डॉक्टरांना त्यांची अँजिओप्लास्टी करावी लागली. श्रेयसच्या हृदयविकाराच्या झटक्याचे वृत्त ऐकून त्याचे चाहते खूपच अस्वस्थ झाले होते. आता श्रेयस तंदुरुस्त झाला आहे आणि त्याने त्याचे भयानक अनुभव देखील सांगितले आहेत.

श्रेयस तळपदे या घटनेनंतर जवळपास 2 महिने आराम करतोय. तसेच काही मुलाखतींमुळेही तो चर्चेत आला आहे. श्रेयस अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये फिटनेसचे महत्त्व आणि ECG या गोष्टींबद्दल बोलला आहे. श्रेयसच्या मते 'ECG हा केवळ जोक आहे'. श्रेयस असं का म्हणाला, चला तर मग जाणून घेऊया.

Shreyas Talpade : 'ECG हा सर्वात मोठा जोक आहे'... श्रेयस तळपदे असं का म्हणाला
Vivek Oberoi : 'जे सुशांतनं केलं तेच मी पण...' 'डार्क फेज' वरुन विवेकनं केला मोठा खुलासा

श्रेयस फिटनेसविषयी बोलताना म्हणाला, एक गोष्ट डॉक्टरांनी त्याला त्यावेळी सांगितली की, 'ज्यावेळी हृदयविकाराचा झटका आला त्यादिवशी त्याला जो वेळ मिळाला तो त्याला त्याच्या फिटनेसमुळे मिळाला. तो शूटिंग संपल्यानंतर घरी आला आणि तिथून हॉस्पिटलमध्ये गेला तो वेळ एक ते दीड तासाचा होता. डॉक्टराने सांगितले एवढा वेळ मिळाल्याचे कारण म्हणजे श्रेयसचा फिटनेस.' श्रेयस मित्र म्हणे युट्यूब चॅनेलवर सौमित्र पोटे यांना दिलेल्या पॉडकास्ट मुलाखतीमध्ये बोलत होता.

श्रेयस या मुलाखतीमध्ये ECG बद्दल म्हणाला की, 'सर्व डॉक्टरांची माफी मागून मला एक सांगावसे वाटते की 'इसीजी हा सर्वात मोठा जोक आहे'. तुम्हाला जेव्हा हृदय विकाराचा झटका येत असतो, तेव्हा तुम्हाला वाटते की तुम्ही मरणार आहात. ECG देखील तुम्हाला तेच सांगतो की, हो तुम्ही बरोबर आहात. त्याचा काहीही उपयोग नाही असे मला वाटते.'

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com