Sonu Sood: 'एक झलक सबसे अलग', ग्रँड एंट्रीवर प्रेक्षकांनी उधळले पैसे |Actor Sonu Sood Acharya movie Grand Entry | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

actor sonu sood

Sonu Sood: 'एक झलक सबसे अलग', ग्रँड एंट्रीवर प्रेक्षकांनी उधळले पैसे

Sonu Sood film Acharya video - आपल्या अभिनयानाबरोबरच सामाजिक भूमिकेसाठी ओळखला जाणारा अभिनेता म्हणून सोनु सूदची वेगळी ओळख आहे. त्याचा सोशल (Social media viral news) मीडियावर त्यासाठी खास बोलबाला आहे. आतापर्यत या अभिनेत्यानं (bollywood News) कोट्यवधी रुपयांची सामाजिक कामं केली आहेत. केवळ टॉलीवूडमध्येच नव्हे तर बॉलीवूडमध्ये देखील त्याचा चाहतावर्ग मोठा आहे. सोनुच्या चित्रपटांशी जोडला (tollywood) गेलेला चाहतावर्गही लक्षणीय आहे. सध्या त्याचा एक व्हिडिओ मोठ्या चर्चेत आला आहे. त्याचे कारण त्याच्या आगामी आचार्य नावाच्या चित्रपटाच्या वेळी झालेली ग्रँड एंट्री. ती त्याच्या चाहत्यांना एवढी भावली की, त्यांनी थिएटरमध्येच त्याच्यावर पैसे उधळण्यास सुरुवात केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

चाहत्यांनी आपल्याला भूमिकेला दिलेल्या प्रतिसादाबद्दल सोनु कमालीचा भावूक झाल्याचे दिसून आले आहे. त्यानं त्याविषयी चाहत्यांचे आभारही मानले आहे. सोशल मीडियावर खास व्हिडिओ शेयर करुन त्यासंबंधी चाहत्यांना मनपूर्वक धन्यवादही दिले आहेत. सोनु त्याच्या आगामी आचार्य नावाच्या चित्रपटामध्ये खलनायक बसवाच्या भूमिकेत दिसणार आहे. काही दिवसांपूर्वी त्याचा एक व्हिडिओही व्हायरल झाला होता. त्याला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले होते. त्या चित्रपटामध्ये त्याच्यासोबत रामचरण, चिरंजीवी यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. दोन दिवसांपूर्वी सोनुचा हा चित्रपट प्रदर्शितही झाला आहे.

सोनुनं सोशल मीडियावर एक खास व्हिडिओ शेयर केला आहे. त्यामध्ये त्याच्या दमदार एंट्रीवर प्रेक्षकांनी पैसे उधळल्याचे दिसून आले आहे. त्या व्हिडिओमध्ये प्रेक्षक त्याच्या ग्रँड एंट्रीवर कमालीचे खूश झाल्याचे पाहायला मिळते. सोनुनं तो व्हिडिओ पाहून प्रतिक्रियाही दिली आहे. त्यामध्ये तो म्हणतो, चाहत्यांच्या प्रेमानं आपण भारावून गेलो आहे. त्यांचे प्रेम तर आपल्याला सतत प्रेरणा देत असते. सोनुच्या त्य़ा व्हिडिओची सध्या मोठ्या प्रमाणवर चर्चा आहे.