प्रख्यात अभिनेते सौमित्र चॅटर्जी यांची प्रकृती चिंताजनक

सकाळ ऑनलाईन टीम
Wednesday, 14 October 2020

चॅटर्जी यांना अत्यावश्यक सेवा पुरविण्यात आल्या आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्यांची ऑक्सिजन पातळी व्यवस्थित असून थोड्याफार फरकाने त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे दिसून आले आहे.

मुंबई - भारतीय चित्रपटसृष्टीतील प्रख्यात अभिनेते सौमित्र चॅटर्जी यांची प्रकृती चिंताजनक आहे. 15 डॉक्टरांची टीम त्यांच्या प्रकृतीवर सतत लक्ष ठेवून आहे. बंगाली चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाने रसिकांची पसंती मिळवणा-या चॅटर्जी यांना मागील काही दिवसांपासून कोरोनाचा त्रास जाणवू लागल्याने त्यांना कोलकाता येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

डॉक्टरांकडून मिळालेल्या माहितीनुसार, चॅटर्जी यांची प्रकृती अद्याप चिंताजनक आहे. त्यांच्यावर सतत लक्ष दिले जात आहे. चॅटर्जी यांचे वय 85 वर्षे असून त्यांनी भारतीय चित्रपटसृष्टीला दिलेल्या योगदानाबद्दल दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. काल रात्री त्यांना व्यवस्थित झोप लागली होती. बाकी इतर कुठलाही त्रास त्यांना नाही. मात्र त्यांच्या शरीरातील सोडीयमची पातळी वाढली आहे. यामुळे त्यांच्यावर आम्ही लक्ष ठेवून आहोत.

रामदेव बाबा की जय हो! हत्तीवर बसून योगा करताना पडले; फराह खान म्हणते...

चॅटर्जी यांना अत्यावश्यक सेवा पुरविण्यात आल्या आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्यांची ऑक्सिजन पातळी व्यवस्थित असून थोड्याफार फरकाने त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे दिसून आले आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर चॅटर्जी यांच्या अभिनयाचे कौतूक करण्यात आले आहे. त्याबद्दल त्यांना गौरविण्यातही आले आहे. त्यांनी सत्यजित रे, मृणाल सेन, तपन सिन्हा. तरुण मुजूमदार यांच्यासारख्या दिग्गजांबरोबर काम केले आहे. ज्या कामाचा समीक्षकांकडून गौरव करण्यात आला आहे. 

आतले आणि बाहेरचे असं काही असतं यावर विश्वास नाही; अभिनेता शरद केळकरची भावना
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Actor Soumitra Chatterjees health condition still critical