esakal | आतले आणि बाहेरचे असं काही असतं यावर विश्वास नाही; अभिनेता शरद केळकरची भावना 
sakal

बोलून बातमी शोधा

sharad kelkar

शरदने एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बॉलीवूडच्या सद्यस्थितीवर मत व्यक्त केले आहे. तो म्हणतो, माझाही प्रवास काही सोपा नाही. संधी मिळवण्यासाठी मला संघर्ष करावा लागला. यात कित्येक ठिकाणी नाकारला गेलो. यासगळ्यातून मला यशाची किंमत काय असते हे शिकायला मिळाले.

आतले आणि बाहेरचे असं काही असतं यावर विश्वास नाही; अभिनेता शरद केळकरची भावना 

sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई - बॉलीवूडमध्ये गेल्या काही दिवसांपासून नेपोटिझमवर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु आहे. अद्याप त्यावर बॉलीवूडमधले कलाकार भाष्य करत असतातच. आता त्यात प्रसिध्द कलाकार शरद केळकर यानेही सध्याच्या परिस्थितीवर मत व्यक्त केले आहे. त्यात त्याने आतले आणि बाहेरचे असं काही नसतं असे म्हटले आहे. प्रस्थापित कलाकारांविरोधात नव्याने येत असलेल्या काही कलाकारांनी बॉलीवूडमधल्या त्याविरोधात आवाज उठविण्यास सुरुवात केली होती. 

शरदने एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बॉलीवूडच्या सद्यस्थितीवर मत व्यक्त केले आहे. तो म्हणतो, माझाही प्रवास काही सोपा नाही. संधी मिळवण्यासाठी मला संघर्ष करावा लागला. यात कित्येक ठिकाणी नाकारला गेलो. यासगळ्यातून मला यशाची किंमत काय असते हे शिकायला मिळाले. याप्रकारचे अनुभव प्रत्येक कलाकाराच्या आयुष्यात येतात. शरदच्या भूमी आणि तान्हाजी या चित्रपटांना रसिकांची चांगली पसंती मिळाली. त्याने यात प्रमुख भूमिका साकारली होती.

बॉलीवूडमध्ये आतले आणि बाहेरचे हा जो प्रकार आहे त्यावरुन वाद होत आहे याविषयी बोलताना शरद म्हणाला, कुणी बाहेरुन येते त्यातून वाद सुरु होतो, अशाप्रकारच्या चर्चांना मी फारसे महत्व देत नाही. तुमच्यात काय आहे, तुमच्यातील गुणवत्ता जास्त महत्वाची ठरते. यात मग तो कलाकार हा टीव्ही वाहिनीवर काम करणारा असो किंवा चित्रपटात त्याच्यातील टॅलेंटला अधिक महत्व द्यावे लागेल. या गोष्टी लक्षात न घेताच त्य़ावर वाद घालण्याचे प्रकार होत आहे. 

मला लग्नचं नाही करायचं, कुणाला काही प्रॉब्लेम ?; सलमानचा बिग बॉसमधल्या स्पर्धकांना प्रश्न

कोणत्य़ाही माध्यमात काम करणे आता तितकेसे अवघड नाही. तुमच्यातील गुणवत्ताच तुम्हाला उंचीवर नेते. यात अनेकजण आतले आणि बाहेरचे असा वाद घालतात. मला ते मान्य नाही. तुम्ही कसे आहात हे प्रेक्षक ठरवतात. त्यांना जर तुमचे काम आवडले तर ते तुम्हाला डोक्यावर घेतात. आता प्रेक्षकांनीच तुम्हाला स्वीकारले नाहीतर ते तुमचा स्वीकार करत नाही हे अनेकजण लक्षात घेत नाहीत. असे शरद सांगतो.

नेटफ्लिक्सची 'बॅड बॉय बिलिनेयर' कायद्याच्या कचाट्यात ?

शरदला वाटते की, तुम्हाला नकार मिळणे हा अनेकदा तुमच्या नशीबाचाही भाग असतो. मी यात 30 टक्के नशीबावर हवाला ठेवतो. उर्वरीत 70 टक्के श्रेय हे तुमच्या मेहनतीला द्यावे लागेल. याबाबत मी स्वतला भाग्य़वान समझतो की मला इंडस्ट्रीत प्रवेश मिळाला आहे.