HBD VARUN:दिव्या भारतीसमोर खूप रडला होता वरूण..काय होते कारण? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Varun Dhawan cried in front of Divya Bharti

HBD VARUN:दिव्या भारतीसमोर खूप रडला होता वरूण..काय होते कारण?

प्रसिद्ध अभिनेता वरूण धवन तरुणींचा आवडता अभिनेता आहे.त्याच्या कॉमेडी अभिनयातून असो वा त्याच्या फायटिंग थ्रील्ड चित्रपटातून,वरूणने त्याची वेगळी ओळख चाहत्यांच्या मनात निर्माण केली आहे.आज वरूण त्याचा ३५ वा वाढदिवस साजरा करतोय.अनुष्का शर्मा,विक्की कौशल,क्रिती सीनन आणि बऱ्याच बॉलीवूड सिताऱ्यांनी वरूणला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

वरूण डायरेक्टर डेविड धवन यांचा मुलगा असल्याने त्याला लहानपणापासूनच चित्रपटसृष्टीतील बऱ्याच गोष्टी माहिती आहेत.(Varun Dhawan)अनेकदा वरूण त्याच्या वडिलांसोबत सेटवर शुटिंग बघण्यास जात असे.एकदा वरूण लहानपणी असाच सेटवर गेला असताना त्याला खूप भूक लागली होती.भूकेने व्याकुळ झालेल्या वरूणने जोरजोरात रडायला सुरूवात केली.१९९२ ची ती गोष्ट होती.(Gowinda)त्यावेळी गोविंदा आणि दिव्या भारतीच्या 'शोला आणि शबनम' या चित्रपटाची शुटिंग सुरू होती.तेव्हा कसे बसे भारतीने वरूणला चूप करण्यासाठी त्याला ऑमलेट बनवून दिले होते.तेव्हा कुठे लहानसा वरूण शांत झाला होता.एका मुलाखतीत बोलताना वरूणने त्याच्या लहानपणीचा हा किस्सा शेअर केला होता.

हेही वाचा: Kriti Sanon च्या 'बॉस लेडी' लूकचा सोशल मीडियावर धुमाकूळ

वरूण अनेकांचा आवडता हिरो असला तरी मात्र वरूणची आवडती हिरोईन त्याला कोणी विचारल्यास तो कायम करिश्माचे नाव सांगतो.त्याला लहानपणापासूनच करिश्मा कपूर आवडते आणि करिश्माला देखिल हे माहिती आहे असे त्याने एका मुलाखतीत सांगितले होते.वरूण २०२२ मधे प्रेक्षकांपुढे त्याच्या वेगवेगळ्या भूमिकेतून दिसणार आहे.नुकतीच त्याने 'बवाल' या चित्रपटाची शुटिंग कानपूरमधे पूर्ण केली आहे.सध्या तो त्याच्या 'भेडिया' या चित्रपटाच्या शुटिंगमधे व्यस्त आहे.वरूणसोबत क्रिती सीनन स्क्रिनवर दिसणार आहेत.

Web Title: Actor Varun Dhawan Cried In Front Of Divya Bharti Said In An Interviewhbd Varun

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top