esakal | अभिनेत्रीला घरात ओलीस ठेवून दरोडेखोरांनी केली साडेसहा लाखांची लूट
sakal

बोलून बातमी शोधा

अभिनेत्रीला घरात ओलीस ठेवून दरोडेखोरांनी केली साडेसहा लाखांची लूट

अभिनेत्रीला घरात ओलीस ठेवून दरोडेखोरांनी केली साडेसहा लाखांची लूट

sakal_logo
By
स्वाती वेमूल

मॉडेल आणि अभिनेत्री अलंकृता सहाय Alankrita Sahai हिला तिच्या घरात ओलीस ठेवून चाकूच्या धाकाने लूट करण्यात आली आहे. दिल्लीतील Delhi सेक्टर २७ मधील एका इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर अलंकृता भाड्याने राहते. मंगळवारी दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास चेहरा झाकून तीन अज्ञात लोकांनी तिच्या फ्लॅटमध्ये जबरदस्तीने प्रवेश केला. त्यानंतर तिला ओलीस ठेवून साडेसहा लाख रुपये लुटले.

अलंकृताने काही दिवसांपूर्वी खरार इथून नवीन फर्निचरची खरेदी केली होती. रविवारीच हे फर्निचर तिच्या घरी पोहोचवण्यात आले होते. फर्निचर पोहोचवणाऱ्यांपैकी एक जण दरोडेखोर असल्याचा संशय तिने पोलिसांकडे व्यक्त केला आहे. तीन दरोडेखोरांपैकी एकाने तिचं एटीएम कार्ड घेतलं आणि ५० हजार रुपये काढून ते तिला परत केलं. तोपर्यंत इतर दोघे तिच्यावर नजर ठेवून होते.

हेही वाचा: भारती सिंगने १५ किलो वजन केलं कमी; सांगितला खास डाएट प्लान

अलंकृताने मदतीसाठी आरडाओरड करण्यास सुरुवात केली असता दरोडेखोरांनी बाल्कनीमधून उडी मारून पळ काढला. आधी पहिल्या मजल्यावरील बाल्कनीत त्यांनी उडी मारली आणि त्यानंतर ते तळमजल्यावर उतरले. या घटनेनंतर घाबरलेल्या अलंकृताने स्वत:ला वॉशरुममध्ये बंद करून घेतलं होतं. संशयित दरोडेखोर हे परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.

loading image
go to top