Amruta Khanvilkar:'तू जे जे केलंस..' कोणासाठी अमृता खानविलकरची खास पोस्ट ? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Actress Amruta shared a special Post for Prasad oak

'तू जे जे केलंस..' कोणासाठी अमृता खानविलकरची खास पोस्ट ?

सध्या सगळीकडे चर्चेत असणारी अभिनेत्री अमृता खानविलकर आणि अभिनेता आदिनाथ कोठारे यांच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'चंद्रमुखी' या चित्रपटाचे सगळीकडे कौतुक झालेले दिसते.अमृता या चित्रपटात 'चंद्रा'ची भूमिकेत साकारताना दिसते.या चित्रपटातील तीच्या अभिनयाचे सगळीकडे कौतुकही होताना दिसतेय.मात्र सध्या अमृताने लिहिलेल्या खास पोस्टचा विचार केला तर कोणासाठी या अभिनेत्रीने ही खास पोस्ट लिहीली आहे हा चर्चेचा विषय आहे.

कोणासाठी आणि काय आहे अमृताची ती खास ?

चंद्रमुखी या चित्रपटाचे दिग्दर्शक प्रसाद ओकने केले आहे.त्याचेच आभार मानत अमृताने प्रसादसाठीची खास पोस्ट लिहीली आहे. (Marathi Actors)"किती वर्णू ग महिमा त्याचा ..... ह्या एका वाक्यात सगळं आलं ...कादंबरी देण्या पासून ते हे शेवटचं गाणं करण्या पर्यंत ... तू जे जे केलंस त्या साठी माझ्या कडे शब्द नाहीत ..... मला स्वतःशी ओळख करून देण्यासाठी मी आयुष्यभर तुझी ऋणी राहीन ....असे लिहत अमृताने एक व्हिडिओ शेअर केलाय.तीच्या या मराठीतील खास कॅप्शन आणि व्हिडिओला प्रेक्षकांच्या प्रतिक्रियाही मिळताय.

पहा काय होती या पोस्टवर प्रसाद ओकची प्रतिक्रिया ?

"गानं ऐकलंय तिचं,नाच पायलाय तिचा..निस्ती चांगली न्हाय... त लैच भारी "कलावंतीन" हाय आमची "चंद्रा".फकस्त नाचातच न्हाय तर अभिनयात बी लैच ताकदीची हाय आमची "चंद्रा".आशीच ऱ्हा "चंद्रा" वानी.म्हंजी लोक जवा बी बघत्याल तवा मान ताठ करूनच बघत्याल तुज्याकडं..!!!!लै लै लै म्हंजी लैच पिरेम."(Marathi Movies) असे लिहत प्रसाद ओकने प्रतिक्रिया दिल्या आहेत.

'चंद्रमुखी' हा चित्रपट लेखक विश्वास पाटील यांच्या ‘चंद्रमुखी’ या कांदबरीवर आधारित आहे. अक्षय बर्दापूरकर, प्लॅनेट मराठी आणि गोल्डन रेशो फिल्म्स निर्मित, क्रिएटिव्ह वाईब प्रॉडक्शन्स प्रस्तुत, फ्लाइंग ड्रॅगन एंटरटेनमेंट, लाइटविदिन एंटरटेनमेंट सहप्रस्तुत या चित्रपटाची पटकथा, संवाद चिन्मय मांडलेकर यांचे असून अजय - अतुल या दमदार जोडीने 'चंद्रमुखी'ला संगीत दिले आहे.

Web Title: Actress Amruta Khanvilkar Shared A Special Post With Caption For Prasad Oak

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top