तीन वर्षांनंतर येणार दोघांत ' तिसरा'

सकाळ ऑनलाईन टीम
Friday, 11 December 2020

अनुष्काच्या अगोदर सकाळी विराटनं त्याच्या लग्नाच्या तिस-या वाढदिवसानिमित्त एक फोटो शेयर केला आहे. त्यालाही दोघांच्या चाहत्यांनी मोठा प्रतिसाद दिला आहे.

मुंबई - अभिनेत्री अनुष्का आणि भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली हे दोघेही सोशल मीडियावर सतत अॅक्टिव्ह असतात. त्यांचा फॅनफॉलोअरही खुप मोठा आहे. त्यामुळे त्यांनी त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल सांगितलेली गोष्ट एंजॉय करतात. अनुष्कानं तिच्या लग्नाच्या तिस-या वाढदिवसानिमित्त केलेली पोस्ट आता चर्चेत आली आहे. त्यामुळे त्यांच्या लग्नाचा वाढदिवसही ट्रेंडिंगचा विषय झाला आहे.

अनुष्कानं सोशल मीडियावर जी पोस्ट केली आहे त्यात तिनं म्हटलं आहे की, तीन वर्षानंतर आमच्या दोघांत आता तिसरा येणार आहे. लवकरच आम्ही तीन जण होणार आहे. अशा शब्दांत अनुष्कानं विराटला एक खास मेसेज केला आहे. तिनं लिहिलं आहे की, 'हमारे तीन साल हुए और जल्दी ही हम तीन होंगे। मिस यू. हा मेसेज सोशल मीडियावर प्रसिध्द केल्यानंतर त्याला काही वेळातच 8 लाखांपेक्षा जास्त हिटस मिळाले आहेत.

अनुष्काच्या अगोदर सकाळी विराटनं त्याच्या लग्नाच्या तिस-या वाढदिवसानिमित्त एक फोटो शेयर केला आहे. त्यालाही दोघांच्या चाहत्यांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. 
 गेल्या काही दिवसांपूर्वी अनुष्कानं शीर्षासनं केल्याचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल केला होता. आपण डॉक्टरांच्या सल्ल्यानं योगासनं केल्याचेही तिनं सांगितले होते. त्याला चाहत्यांनी आपली पसंती दर्शविली होती. 

'वडिलांशी भांडून पुण्याला आले, कँटीनमध्ये नोकरी केली'

 अनुष्कानं तिनं जो एक नवीन फोटो व्हायरल केला आहे त्यावर तिनं म्हटले आहे की, आमच्या वैवाहिक आयुष्याची तीन वर्षे मोठ्या आनंदात पार पडली. यावेळी दोघांनी एकमेकांना साथ दिली हे सांगायला आनंद वाटतो. व्टिटवर आणि इंस्टावर तिनं हा मेसेज व्हायरल केला आहे. सध्या विराट हा ऑस्ट्रेलियाच्या दौ-यावर आहे. यावेळी अनुष्का आपल्या आई वडिलांसोबत मुंबईमध्ये राहत आहे. अलीकडे दुबईमध्ये झालेल्या आयपीएलच्या सामन्यांमध्ये अनुष्का ही विराट सोबत दिसली होती. ज्यावेळी विराट ऑस्ट्रेलियाच्या दौ-यावर गेला त्यावेळी ती मुंबईला आली. 
 
 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Actress Anushka Sharma share post on her third marriage anniversary virat commented