Chrisann Pereira: संजय दत्तची अभिनेत्री क्रिसन परेराची अखेर दुबईहून सुटका, काय आहे प्रकरण?

क्रिसनने तुरुंगाची हवा खाल्ली आणि आता ती मायदेशी परतली आहे
actress Chrisann Pereira finally released from Dubai in drugs case know details
actress Chrisann Pereira finally released from Dubai in drugs case know details SAKAL

Chrisann Pereira News: बॉलिवूड अभिनेत्री क्रिसॅन परेरा अखेर मायदेशी परतली आहे. चार महिने खोट्या ड्रग्स केसमध्ये अडकल्यानंतर तिची शारजा वरून सुटका झाली. मायदेशी परतताच क्रिसॅनने मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेतली.

क्रिसॅनने सडक २ आणि बाटला हाऊस चित्रपटात काम केलंय. १ एप्रिलला अमली पदार्थ बाळगल्या प्रकरणी क्रिसॅनला शारजा विमानतळावर अटक झाली होती. २६ दिवस तिला तुरुंगाची हवा खायला लागली.

(actress Chrisann Pereira finally released from Dubai in drugs case know details)

actress Chrisann Pereira finally released from Dubai in drugs case know details
N D Mahanor: अलविदा, रानकवी..! हेमांगी कवी ना.धों. महानोरांच्या निधनानंतर भावुक

बॉलिवुड अभिनेत्रीवर कारागृहात वॉशिंग पावडरने केस धुणे तसेच टॉयलेटच्या पाण्याने कॉफी करण्याची वेळ आली होती.

क्रिसॅनच्या कुटुंबीयांनी तिला खोट्या गुन्ह्यात अडकवल्याची तक्रार करताच गुन्हे शाखेने तपासाची चक्रे फिरवत केली होती. याप्रकरणी अँथनी पॉलला अटक झाली.

क्रिसॅनच्या आईशी झालेल्या भांडणाचा राग म्हणून क्रिसॅनला शारजा येथे पाठवून अँथनी पॉलने तिला खोट्या गुन्ह्यात अडकवले होते. अँथनीने शारजा येथे जाताना क्रिसॅनला अमली पदार्थ लपवलेली एक भेटवस्तू दिली.

याशिवाय अँथनीने आधीच क्रिसॅन शारजा येथे उतरताच तेथील यंत्रणेला माहिती दिली होती. मुंबई पोलिसांनी तत्काळ तपास करत आरोपींना अटक केली आणि दुतावासा मार्फत याची माहिती शारजा यंत्रणेला दिली. त्यामुळे क्रिसॅनची सुटका झाली.

actress Chrisann Pereira finally released from Dubai in drugs case know details
अभिषेक मल्हान ठरला Bigg Boss OTT 2 चा पहिला फायनलिस्ट, चाहत्यांनी केलं सेलिब्रेशन

मुंबईतील DJ क्लेटन रॉड्रि्ज याला देखील अँथनी पॉलने असंच खोट्या गुन्ह्यात अडकवले असून रॉड्रि्ज अजून शारजा येथील तुरुंगात आहे.

त्याच्या सुटकेचे देखील प्रयत्न सुरू आहेत. एकूण पाच जणांना अँथनीने शारजाला पाठवून त्यांना अडकवण्याचा प्रयत्न केला होता. सुदैवाने तिघे मात्र जाळ्यात अडकलेच नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com