esakal | मलायकाचं कुत्रं आणि ती काही खरं नाही; Video Viral
sakal

बोलून बातमी शोधा

 actress dancer Malika Arora shares video playing with her dog coco

व्हॅलेटाईनच्या दिवशीही मलायकानं आपला प्रियकर अर्जुन कपुर सोबत एक व्हिडिओ शेअर केला होता.

मलायकाचं कुत्रं आणि ती काही खरं नाही; Video Viral

sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई - केवळ अभिनेत्री म्हणून मलायकाची ओळख नाही. तर फिटनेस ट्रेनर म्हणूनही तिनं आता वेगळी छाप उमटवायला सुरुवात केली आहे. लोकांना घरबसल्या योगासनांचे धडे देण्याचे काम मलायका करते. वयाची चाळीशी पार केली असली तर तिनं ज्या पध्दतीनं फिटनेस ठेवला आहे तो प्रेक्षकांच्या खास आवडीचा विषय आहे. यामुळेच की काय मलायकाचे कोणतेही नवे फोटोशुट आल्यानंतर ते आवर्जुन पाहणे हा त्यांच्या आवड़ीचा भाग आहे. आताही मलायका तिच्या एका व्हिडिओमुळे चर्चेत आली आहे.

मलायकाचा जो नवीन व्हिडिओ आला आहे त्यात ती तिच्या कुत्र्याबरोबर खेळताना दिसत आहे. त्यात तिनं केलेल्या गंमतीमुळे तो व्हिडिओ कमालीचा लोकप्रिय झाला आहे. आतापर्यत त्या व्हिडिओला 8 लाख व्ह्युज मिळाले आहेत. मलायकाच्या फॅन्सनंही तिला मोठ्या प्रमाणात लाईक्स आणि कमेंटस दिल्या आहेत. काही तासांपूर्वी हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला होता. त्या व्हिडिओमध्ये मलायकानं आपण काय काय केलं हे सांगितले आहे. आपल्या आवडत्या पपीबरोबर खेळताना ती दिसत आहे. त्यात तिनं व्हाईट कलरचे टॅक टॉप आणि ब्लॅक कलरचे जीम शॉर्टस् घातले आहेत.

मलायकानं पपी सोबत खेळतानाचा व्हिडिओ शेअर करुन त्याबद्दल लिहिले आहे की, आमची छोटीसी कोको आणि मी दररोज मस्ती करतो, आम्हाला खुप आनंद होतो. हे मी केवळ कॅस्परसाठी म्हणत नाही. जो कोकोला फार घाबरतो. तिच्या या पोस्टला चाहत्यांनी पसंत केले आहे. सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असणारे जे सेलिब्रेटी आहेत त्यात मलायकाचं नाव सर्वात अगोदर घ्यावे लागेल. ती कायम आपले वेगवेगळे फोटो, व्हिडिओ शेअर करुन चाहत्यांची वाहवा मिळवत असते.

 'नाव संतोष आनंद, मात्र आयुष्यभर दु:खचं वाट्याला आलं'

याला म्हणतात खरा चाहता; सोनू सूदसाठी चालवली 2000 किमी सायकल

व्हॅलेटाईनच्या दिवशीही मलायकानं आपला प्रियकर अर्जुन कपुर सोबत एक व्हिडिओ शेअर केला होता. तो ही सोशल मीडियावर लोकप्रिय झाला होता. त्या दोघांच्या रिलेशनशिपवरुन चर्चा रंगली होती. याशिवाय मलायकाचा फिटनेस लुक पाहणे हे अनेकांचे काम आहे. त्याला मिळणारा प्रेक्षक मोठा आहे. मलायकाचे जीमच्या बाहेरचे फोटो सोशल मीडियावर दर दोन ते तीन दिवसांच्या अंतराने प्रसिध्द होत असतात.