Esha Gupta: स्टार कीड्सवर का भडकली ईशा गुप्ता ? म्हणाली, फ्लॉप चित्रपटानंतरही यांना... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Actress Esha Gupta shared her journey by targeting star kids

स्टार कीड्सवर का भडकली ईशा गुप्ता ? म्हणाली, फ्लॉप चित्रपटानंतरही यांना...

आश्रम अभिनेत्री ईशा गुप्ता तिच्या सोनियाच्या रूपातील बोल्ड लूकमुळे सध्या चांगलीच चर्चेत आहे.ही अभिनेत्री सोशल मीडियावरही बरीच अॅक्टिव्ह असते.बोल्ड लूक देणाऱ्या अभिनेत्रींमधे ती कुठेही स्वताला मागे पडू देताना दिसत नाही.इनरान हाश्मीच्या जन्नत २ मधून बॉलीवुडमधे पदार्पण करणाऱ्या ईषा गुप्ताला इन्डस्ट्रीमधे येऊन दहा वर्षांपेक्षा जास्त काळ झालाय.एका मुलाखतीत अखेर ईशा नेपोटीझमच्या मुद्द्यावर बोलली.यावेळी नेपोटिझमच्या आणि स्टार किड्सला होणाऱ्या फायद्याबाबतचं ईशानं स्वत:चं वयक्तिक मत मांडत तिच्या प्रवासाबद्दल सांगितलं.

आऊटसाईडरला कोणीही मार्गदर्शन करत नाही म्हणाली ईशा

नुकत्याच दिलेल्या एका इंटरव्यूमधे ईशाने आऊटसाईडरला मिळणाऱ्या वागणुकीबाबतचं आणि संघर्षाबाबतचं दु:ख व्यक्त केलंय.ईशा म्हणते,'जे इंडस्ट्रीमधे बाहेरून आलेले आहेत,त्यांच्याबाबतीत मला एवढंच वाटतं की,त्यांना रडायला देखील कोणाचा खांदा मिळत नाही.ना इथे कोणी त्यांना मार्गदर्शन करायला असणार.कारण आतापर्यंत मी ज्या ही लोकांना भेटली त्यातले फार कमी लोकं मला चांगले वाटले.'(Nepotism)

हेही वाचा: Esha Gupta Fitness: ईशाला जीम करताना पाहिलं तर थकवा दूर होईलच शिवाय...

एका मुलाखतीत अखेर ईशा नेपोटीझमच्या मुद्द्यावर बोलली.यावेळी नेपोटिझमच्या आणि स्टार किड्सला होणाऱ्या फायद्याबाबतचं ईशानं स्वत:चं वयक्तिक मत मांडत तिच्या प्रवासाबद्दल सांगितलं.

पुढे ती म्हणते,"मला अनेकदा असं वाटायचं की मी इंडस्ट्रीतील असती तर फार बरं झालं असतं.मी इंडस्ट्रीतील असते मला करियरमधे एवढ्या अडचणी आल्या नसत्या.जेव्हा तुम्ही स्टार कीड असता तेव्हा तुम्ही वाईट असू शकता,अनेक फ्लॉप चित्रपट देऊ शकता तरी तुमच्या करियरवर त्याचा कुठलाच असर पडत नाही.कारण लगेच पुढची संधी त्यांच्याकडे तयार असते."ईशा गुप्ताने स्टार किड्सवर निषाणा साधत तिचा करियरमधील अनुभव यावेळी सांगितला.

Web Title: Actress Esha Gupta Target Star Kid In An Interview She Talked On Nepotism

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..