हात फ्रॅक्चर झाला तरी रितेशसोबत जेनेलिया पोहोचली सेटवर 

genelia dsouza  riteish deshmukh
genelia dsouza riteish deshmukh

हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात क्युट कपल म्हणजे अभिनेत्री जेनेलिया डिसूझा आणि अभिनेता रितेश देशमुख. जेनेलिया नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते. ती रितेशसोबतचे आणि मुलांसोबतचे धमाल मस्तीचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करते. या व्हिडीओला तिच्या चाहत्यांची पसंती मिळते. काही दिवसांपूर्वी जेनेलियाने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये ती स्केटिंग खेळताना पडताना दिसली. त्यावेळी तिचा हात फ्रॅक्चर झाला. हाताला दुखापत झाल्यानंतरही जेनेलियाने रितेशसोबत एका जाहिरातीचे शूटिंग पूर्ण केले आहे. 

शूटिंच्या सेटवर जेनेलिया पांढऱ्या रंगाच्या फ्लोरल प्रिंट साडीमध्ये खूप सुंदर दिसत होती. तसेच रितेश देखील कुर्ता पायजम्यामध्ये हँडसम दिसत होता. दोघांचे शूटिंग लोकेशनवरील फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. चाहत्यांनी जेनेलियाला तिच्या हाताची काळजी घेण्यास सांगितलं आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Voompla (@voompla)

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Genelia Deshmukh (@geneliad)

काही दिवसांपूर्वी जेनेलियाने रितेशसोबतचा एक हटके व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये जेनेलियाचा हात फ्रॅक्चर झाल्याने रितेश तिचे केस बांधून देत आहे. या व्हिडीओमध्य रितेश आणि जेनेलियाचा रोमँटिक अंदाज पहायला मिळाला होता. 'तुझे मेरी कसम' या हिंदी चित्रपटाच्या सेटवर जेनेलिया आणि रितेशची पहिल्यांदा ओळख झाली. जेनेलिया आणि रितेश अनेक वर्ष एकमेकांना डेट करत होते. त्यानंतर त्यांनी 2012 साली लग्न केले. जेनेलिया आणि रितेशला राहिल आणि रियान नावाची दोन मुलं आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com