'जीमसुटवर नव्हे साडीवरच मारले पुशअप्स' व्हिडीओ व्हायरल

actress gul panag push ups in sari video viral
actress gul panag push ups in sari video viral

मुंबई -एखादी गोष्ट करायची  तर त्यासाठी हवी असते मनाची जिद्द. इतर कुठल्या गोष्टींचा त्यावर फारसा काही फरक पडत नाही. बॉलीवूडमधील असे काही सेलिब्रेटी आहेत जे कायम आपल्या वेगळेपणासाठी प्रसिध्द आहेत. त्याकरिता ते कायम त्यांच्या चाहत्यांच्या चर्चेचा विषय असतात. अभिनेत्री गुल पनाग सध्या तिच्या आगळ्या वेगळ्या प्रकारच्या व्हिडीओमुळे चर्चेत आली आहे.

तसं पाहिलं तर अनेक सेलिब्रेटी हे आपल्या वर्क आऊटचे फोटो सोशल मीडियावर शेयर करत असतात. त्यावेळी जीम सुटमधील त्यांच्या लुकवर चाहते लाईक्स आणि आवडीने कमेंट करतात. मात्र त्याशिवाय लक्ष वेधून घेण्यासाठी कुणी काही वेगळा प्रयोग केला असेल तर त्यालाही चाहत्यांचा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून येते. प्रयोगशील अभिनेत्री म्हणून ओळखल्या जाणा-या अभिनेत्री गुल पनागचा एक व्हिडीओ नुकताच व्हायरल झाला आहे. त्यात तिनं जीम सुटवर नव्हे तर साडीवरच पुशअप्स मारले आहेत.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Gul Panag (@gulpanag)

व्यायाम करण्यासाठी ना कुठल्या अशा खास पोशाखाची गरज नाही हे गुलनं तिच्या व्हिडीओतून दाखवले आहे. यात तिनं साडी परिधान करुन केलेल्या पुशअप्सला रसिकांनी मोठा प्रतिसाद दिला आहे. कमेंट देऊन तिचा उत्साह वाढवला आहे. या व्हिडीओच्या माध्यमातून तिने व्यायाम करण्यासाठी आपल्या चाहत्यांना प्रेरणा दिली आहे.  तुम्ही कधीही, कुठेही, कुठल्याही कपड्यांवर तुम्ही व्यायाम करु शकता अशा आशयाची कॉमेंट तिने या व्हिडीओवर केली आहे.

वेगळेपणा हा गुल पनागच्या अभिनयाचा एक महत्वाचा भाग राहिला आहे. त्यासाठी ती ओळखली जाते. तिनं आजवर जे काही चित्रपट केले आहेत त्यात ती जाणकार प्रेक्षक, समीक्षक यांच्या कौतूकास पात्र ठरली आहे. तिनं 2003 साली ‘धुप’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये इंट्री केली. जुर्म, हेलो, समर 2007, अनुभव, रन यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये तिनं अभिनय केला.  

केवळ चित्रपटच नव्हे तर कश्मिर, खुबसुरत, मुसाफिर हू यारो यांसारख्या काही मालिकांमध्येही काम केलं आहे. ‘द फॅमिली मॅन’ या वेब सीरिजमधील तिच्या कामाची तिच्या चाहत्यांनी प्रशंसा केली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com