हेमांगी कवीला हॉट पुरुषांविषयी काय वाटतं?  व्हिडिओ झाला व्हायरल.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

hemangi kavi

हेमांगी कवीला हॉट पुरुषांविषयी काय वाटतं?व्हिडिओ झाला व्हायरल..

Entertainment News : अभिनयापलीकडे अनेक सामाजिक विषयांवर, स्त्रियांच्या प्रश्नांवर बेधडक मत मांडणारी आणि त्यामुळे चर्चेत असणारी अभिनेत्री हेमांगी कवी (hemangi kavi) पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर आली आहे. यंदा तिचा खास अंदाज चाहत्यांना पाहायला मिळतोआहे. कारण चक्क हॉट पुरुषांविषयी तिने भाष्य केले आहे.

हेही वाचा: ''हे तर दहशतवाद्यांना पाठिंबा देणारे लोक'', विवेक अग्निहोत्री संतापले

हेमांगी कवी हे मराठी मनोरंजन विश्वातील एक महत्वाचं नाव. अनेक मालिका, चित्रपट, नाटक तिच्या कसदार अभिनयाने गाजले आहेत. अभिनयासोबतच निरनिराळ्या कारणाने ती चर्चेत असते. विशेष म्हणजे अभिव्यक्तीच्या आधारावर अत्यंत परखडपणे आपले पुरोगामी विचार लोकांपर्यंत पोहचवत असते. त्यामुळे ती कायमच सोशल मीडियावर आपल्याला सक्रिय दिसते. सध्या तिच्यातली अवखळ आणि मिश्किल मुलगी बाहेर आली असून एक व्हिडीओ तिने तयार केला आहे.

हेही वाचा: नागराज नाही.. आता ''डॉक्टर नागराज पोपटराव मंजुळे''

या व्हिडीओत हेमांगी गाडीत असल्याचे दिसत आहे. याच वेळी समोरून कुणीतरी जातो आणि ती टक लावून त्याच्याकडे पाहत बसते, अशातच कुणीतरी तिच्याकडे पाहत असतं. हे जेव्हा तिला समजतं तेव्हा ती भानावर येते. अशी हा व्हिडीओ तिने तिच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे.

'एक हॉट मुलगा रस्ता क्रॉस करत असताना तुमच्याकडे पाहून स्माईल करतो आणि त्याच्याकडे तुम्ही पाहत असतानाच तुमचा एक चाहता हे सगळं पाहत असतो,' असे कॅप्शन तिने या वव्हिडीओला दिले आहे. तसेच हे सत्य घटनेवर आधारीत असून ''सेलिब्रिटी असणं इतकं सोपं नाही'' असेही ती म्हणते. हेमांगीचा हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला असून त्याला चाहत्यांची पसंती मिळत आहे. हेमांगीच्या या व्हिडीओवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या असून त्यांच्यासोबतही असे घडल्याचे सांगितले आहे.

Web Title: Actress Hemangi Kavi Shared A Video About Watching Hot

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..