नागराज नाही... आता ''डॉक्टर नागराज पोपटराव मंजुळे'' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

nagraj manjule

नागराज नाही.. आता ''डॉक्टर नागराज पोपटराव मंजुळे''

Entrntainment news : फॅन्ड्री, सैराट, झुंड सारख्या वेगळ्या धाटणीच्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनापर्यंत पोहोचलेल्या दिग्दर्शक नागराज पोपटराव मंजुळे (nagraj manjule) यांना लेखक, दिग्दर्शक, कवी यासह आणखी एक उपाधी प्राप्त झाली आहे. ही आजवरची त्यांना मिळालेली सर्वोच्च उपाधी म्हणता येईल. मंजुळे आपल्या हटके विषयांमुळे कायमच चर्चेत असतात. गेल्या काही दिवसात झुंड चित्रपटामुळे या चर्चांना अधिकच उधाण आले. आता नागराज चक्क 'डॉक्टर' झाले असल्याने अनेकांची झोप उडाली आहे.

हेही वाचा: ''हे तर दहशतवाद्यांना पाठिंबा देणारे लोक'', विवेक अग्निहोत्री संतापले

आता मंजुळेंच्या नावापुढे डॉक्टर हे बिरुद लागणार असून डी. वाय. पाटील विद्यापीठाकडून त्यांना हा सन्मान देण्यात आला आहे. त्यांच्या चित्रपट क्षेत्रातील योगदानाबद्दल 'डॉक्टरेट' ही पदवी प्रदान करण्यात आली आहे. नागराज मंजुळे यांचे मित्र प्रा. हनुमंत लोखंडे यांनी याबाबतची माहिती समाज माध्यमांना दिली.

हेही वाचा: द कपिल शर्मा शो होणार बंद? शो बंद होण्याला कपिलच आहे कारणीभूत

लोखंडे यांनी नागराज मंजुळे डॉक्टर पदवी स्विकारतानाचे काही फोटो फेसबुकवर शेअर केले आहेत. शिवाय ' पुणे विद्यापीठात एम.फिल आणि SET/NET परीक्षांची तयारी करताना त्या अंधारल्या दिवसांमध्ये चकरा मारतानाचे तुम्ही आजही आठवतात. तेव्हा तुमचाही असाच सन्मान व्हावा असे मला वाटायचे, ती इच्छा आज पूर्ण झाली,' अशा शब्दात लोखंडे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. नागराज मंजुळेंचे कौतुक करताना त्यांनी चार्ली चॅप्लिन यांचेही उदाहरण दिले आहे. चार्ली चॅप्लिन म्हणतो, 'अपयश फारसे महत्वाचे नसते. स्वतःला मूर्ख बनवण्यासाठी धैर्य लागते.' असे उदाहरण त्यांनी दिले आहे.

'तुम्ही अपयशाच्या झळा सोसत होता पण संघर्षापुढे तुम्ही कधीही हार मानली नाही. तुमचा दहावी इयत्ता सोडल्यापासून ते डी.लिटपर्यंतचा एक अविश्वसनीय, स्वप्नवत प्रवास आहे. अनेक प्रतिष्ठित चित्रपटांसाठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांद्वारे सन्मानित झाल्यानंतर आता डी. वाय. पाटील विद्यापीठाद्वारे तुम्हाला डॉक्टर ऑफ लेटर्स (D. Litt.) ही मानद पदवी प्रदान करण्यात येत आहे. याचा साक्षीदार होणे हा अतिशय आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण आहे,' असे गौरवोद्गार लोखंडे यांनी आपल्या पोस्ट मध्ये लिहिले आहेत.

हेही वाचा: "काश्मीरी पंडितांची थट्टा करु नका"; अनुपम खेर केजरीवालांवर भडकले

‘द फेमस फेल्युअर्स’मध्ये तुमचे नाव कोरले गेले आहेच पण शिक्षणात देखील एवढी सर्वोच्च पदवी मिळवणे ही आश्चर्यची बाब आहे. डॉ. नागराज मंजुळे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तुमच्या स्टडी रूममध्ये लावण्यासाठी एक परिपूर्ण फ्रेम तुम्हाला मिळाली. माझे मित्र-तत्वज्ञ-मार्गदर्शक म्हणून माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे,' असे प्रा. हनुमंत लोखंडे यांनी लिहिले आहे.

Web Title: D Y Patil University Honored Director Nagraj Manjule With Doctor Of Letters

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..