''हे तर दहशतवाद्यांना पाठिंबा देणारे लोक'', विवेक अग्निहोत्री संतापले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

vivek agnihotri

''हे तर दहशतवाद्यांना पाठिंबा देणारे लोक'', विवेक अग्निहोत्री संतापले

काश्मिरी पंडितांवर १९९० साली झालेले अत्याचार आणि त्यांचे पलायन यावर आधारित असलेल्या दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांच्या ‘द कश्मीर फाइल्स’ (the kashmir files) या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर २०० कोटींहून अधिक कमाई केली आहे. या चित्रपटातला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळत आहे. जितके प्रेम या चित्रपटावर केले जात आहेत. तितकेच वाद देखील उद्भवले आहे.

हेही वाचा: "काश्मीरी पंडितांची थट्टा करु नका"; अनुपम खेर केजरीवालांवर भडकले

घडलेल्या घटनेचे वर्णन चुकीच्या पद्धतीने करून प्रेक्षकांच्या मनामध्ये द्वेष निर्माण केला जात आहे, असा आरोप एका विशिष्ट विचारधारेच्या लोकांकडून होत आहे. हा चित्रपट मुस्लिम विरोधी विचारांना खतपाणी घालणारा असून यामुळे जनमानसात तेढ निर्माण होउ शकते अशी भीती अनेक राजकीय नेत्यांनी वर्तवली आहे. तर काहींनी या चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची भाषा देखील केली आहे.

हेही वाचा: द कपिल शर्मा शो होणार बंद? शो बंद होण्याला कपिलच आहे कारणीभूत

या सर्व विरोधकांना विवेक अग्नीहोत्री (vivek agnihotri) यांनी कडक शब्दात उत्तर दिले आहे. ‘इ-टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले, 'घडलेल्या घटनेला चित्रपटाच्या माध्यमातून लोकांपुढे आणण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला आहे. यात काहीही चुकीचे किंवा खोटे नसून इतिहासात घडलेल्या अत्याचाराची एक काळी पण सत्य बाजू समोर आणली आहे. हा चित्रपट दहशतवादाचा विरोध करतो. पण राजकीय उद्देशाने यावर टीका करणाऱ्यांबाबत खंत वाटते. राजकारण ही एक कला आहे,' अशी टीका त्यांनी केली.

the kashmir files

the kashmir files

‘मला वाटतं ही मोठी समाजसेवा आहे कारण तुम्ही वाईट आणि चांगल्याचे वर्गीकरण करत आहात. खरं तर, मी वर्गीकरण हा शब्दही वापरणार नाही. मी म्हणेन की या चित्रपटाद्वारे मानवतेचे समर्थन करणारे, मानवी हक्कांचे समर्थन करणारे आणि दहशतवादाच्या व्यवसायात असलेले लोक यांच्यात फरक आहेत. जे दहशतवाद्यांचे समर्थन करत होते ते एका बाजूला आहेत आणि आपल्या बाजूला मानवतेचे समर्थन करणारे लोक मोठ्या संख्येने आहेत. हा चित्रपट २ कोटींहून अधिक लोकांनी पाहिला असून त्यांच्यामध्ये चित्रपटाला वर्गीकरण करणारा किंवा फूट पाडणारा चित्रपट आहे असे म्हणणारा माणूस तुम्हाला सापडणार नाही. दहशतवाद्यांचे समर्थन करणारे लोक या चित्रपटावर टीका करत आहेत.’ असे विवेक अग्निहोत्री या मुलाखतीत म्हणाले.

हेही वाचा: गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना सांगीतिक मानवंदना

‘हा चित्रपट राम आणि रावण यांच्यातील फरक दाखवतो. चित्रपटाला विरोध करणारे दहशतवादी विचारधारेचे असून मी त्या दहशतवाद्यांबद्दल का बोलू? त्यापेक्षा मी मानवतेचे समर्थन करणार्‍या लोकांना या दहशतवाद्यांना पराभूत करण्यास आणि त्यांना नष्ट करण्यास सांगेन,’ अशा कठोर शब्दात त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली.

Web Title: People Who Support Terrorists Are Ones Criticising The Kashmir Files Vivek

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top