Janhvi Kapoor: जान्हवीच्या बॉयफ्रेंडसोबत दिसले बोनी कपूर! व्हिडिओ व्हायरल... लग्नाच्या चर्चांना उधाण

एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये जान्हवी कपूरचा रूमर्ड बॉयफ्रेंड शिखर पहारिया बोनी कपूरसोबत दिसत आहे.
 janhvi kapoor, shikhar pahariya boney kapoor
janhvi kapoor, shikhar pahariya boney kapoor Sakal

शुक्रवारी मुंबईतील नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरच्या लाँचिंग इव्हेंटमध्ये बॉलिवूडचे सर्व बडे स्टार्स उपस्थित होते. मुकेश अंबानींच्या या खास कार्यक्रमात निर्माते बोनी कपूरही सहभागी झाले होते.

सेलिब्रिटींचे फोटो आणि व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहेत. त्याचवेळी, एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये जान्हवी कपूरचा रूमर्ड बॉयफ्रेंड शिखर पहारिया बोनी कपूरसोबत दिसत आहे.

व्हिडिओमध्ये जान्हवी कपूरचा रूमर्ड बॉयफ्रेंड शिखर बोनी कपूरसोबत पापाराझींसमोर पोज देताना दिसत आहे. यादरम्यान बोनी कपूर ग्रे रंगाच्या पोशाखात दिसत आहेत. तर दुसरीकडे तो पांढरा शर्ट, हिरवा जॅकेट आणि काळी पँटमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. जान्हवी कपूरनेही या कार्यक्रमाला हजेरी लावली होती, मात्र तिने पापाराझींसमोर पोज दिली नाही.

 janhvi kapoor, shikhar pahariya boney kapoor
Nita Ambani: 59 वर्षीही इतकी उर्जा! NMACC इव्हेंटमध्ये 'रघुपती राघव राजा राम' वर नीता अंबानींचा डान्स... व्हिडिओ व्हायरल

गेल्या महिन्यात शिखरने जान्हवी कपूरला तिच्या वाढदिवसानिमित्त सोशल मीडियावर रोमँटिक पद्धतीने शुभेच्छा दिल्या होत्या. त्याने एक फोटो शेअर केला होता, ज्यामध्ये शिखर आणि जान्हवी कपूरचे चेहरे दिसत नव्हते. दोघेही रात्री बीचवर उभे असलेले दिसले. फोटो पोस्ट करताना शिखरने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'हॅपी बर्थडे'. यासोबतच त्याने हार्ट इमोजीही शेअर केला होता.

गेल्या काही काळापासून जान्हवी कपूर आणि शिखर अनेकदा एकमेकांसोबत स्पॉट झाल्याची माहिती आहे. मात्र, आतापर्यंत दोघांनीही त्यांच्या नात्यावर बोलले नाहीत.

विशेष म्हणजे जान्हवी कपूर लवकरच 'एनटीआर ३०' या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाद्वारे ती साऊथ फिल्म इंडस्ट्रीत पदार्पण करणार आहे. याशिवाय तिच्याकडे 'बवाल', 'बडे मियाँ छोटे मियाँ', 'मिस्टर अँड मिसेस माही' असे सिनेमे आहेत, जे एकापाठोपाठ एक चित्रपटगृहात दाखल होतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com