esakal | दिसला बाबा एकदाचा! तैमूरच्या भावाचा फोटो व्हायरल
sakal

बोलून बातमी शोधा

दिसला बाबा एकदाचा! तैमूरच्या भावाचा फोटो व्हायरल

दिसला बाबा एकदाचा! तैमूरच्या भावाचा फोटो व्हायरल

sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - आपल्या वेगळ्या अंदाजासाठी बॉलीवूड अभिनेत्री करिना कपूर (kareena kapoor) ही नेहमीच चर्चेत असते. फार कमी अभिनेत्री अशा आहेत ज्यांच्या वाट्याला सतत वेगवेगळ्या कारणास्तव लोकप्रियता आली आहे. करिना कपूर आणि सैफ अली खान (saif ali khan) हे सध्याच्या घडीला बॉलीवूडमधील सर्वात चर्चेत असणारं कपल आहे. त्यांना नेहमीच चाहत्यांची पसंती मिळाल्याचे दिसून आलं आहे. त्यांनी आपल्या पहिल्या मुलाचे नाव जेव्हा तैमुर ठेवले होते तेव्हाही त्यांनी मोठ्या प्रमाणावर ट्रोल करण्यात आले होते. पण ते आपल्या निर्णयावर ठाम होते. त्यांच्या दुसऱ्या मुलाचे नाव जेह अर्थात जहांगीर असे ठेवण्यात आले तेव्हाही त्यांना अनेकांच्या रोषाला सामोरं जावं लागलं. आपण त्या गोष्टींचा त्रास करुन घेत नाही. अशी प्रतिक्रिया करिना आणि सैफ अली खाननं दिली होती.

सैफनं जेव्हा आदिपुरुषमध्ये रावणाची भूमिका करणार असून त्यात रावणाच्या चांगल्या गोष्टी लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न केला आहे. असं सांगितलं होतं तेव्हा काही संघटनांनी त्याच्या भूमिकेला विरोध केला होता. त्या दरम्यान करिनानं आपणही सीतेच्या भूमिकेसाठी किती मानधन घेणार याविषयी सांगितलं होतं. त्यावरुन तिच्याविरोधात नाराजीचा सूर दिसून आला. अशाप्रकारे कायम चर्चेत असणाऱ्या या कपल्सच्या मुलांचे फोटो जेव्हा सोशल मीडियावर व्हायरल होतात तेव्हा ते चाहत्यांच्या पसंतीचा विषय असतात. तैमुरच्या फोटोला तर एखाद्या बॉलीवूडच्या सेलिब्रेटीपेक्षाही अधिक पसंती मिळाल्याचे अनेकदा पाहायला मिळते.

चाहत्यांना ज्या फोटोची सर्वाधिक उत्सुकता होती अशा तैमुरच्या भावाचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. करिनानं आपल्या लहान मुलाचे फोटो व्हायरल होणार नाहीत याची काळजी घेतली होती. त्यामुळे आपल्याला विनाकारण त्रास होतो अशी तिची प्रतिक्रिया होती. तैमुरला लहान भाऊ झाल्यापासून त्याचा एकही जाहीर असा फोटो करिनानं पोस्ट केला नव्हता. त्यामुळे आता सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोनं चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्यांनी छोटया जेहचं कौतूकही केलं आहे.

हेही वाचा: सिंघम 2 फेम अभिनेता ड्रग्ज प्रकरणात अटक, शाळेतली मुलं होती ग्राहक

हेही वाचा: De Dhakka 2: थांबायचं नाय, सिद्धार्थनं सांगितली रिलिज डेट

त्या फोटोचं निमित्तं होतं कुणाल खेमू आणि सोहा अली खान यांच्या मुलीच्या वा़ढदिवसाचं. त्यांच्या मुलीचं नाव इनाया असं आहे. त्या घरगुती कार्यक्रमाला सैफ अली खान आणि करिना कपूर गेले होते. त्यावेळी तिथे तिला स्पॉट करण्यात आले. काही फोटोग्राफर्सनं तिला जेहसोबत टिपले आणि आता ते फोटो व्हायरल झाले आहेत. अशाप्रकारे करिनाचा जहांगीरसोबतचा फोटो सोशल मीडियावर येणं ही पहिलीच वेळ आहे.

loading image
go to top