esakal | 'माझ्या बाबांना घेऊन गेला, पाच वर्षे नव्हती गणरायाची प्रतिष्ठापना'
sakal

बोलून बातमी शोधा

'माझ्या बाबांना घेऊन गेला, पाच वर्षे नव्हती गणरायाची प्रतिष्ठापना'

'माझ्या बाबांना घेऊन गेला, पाच वर्षे नव्हती गणरायाची प्रतिष्ठापना'

sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - बॉलीवूड (bollywood) आणि गणरायाचा उत्सव हे समीकरण तसं जूनचं आहे. अनेक सेलिब्रेटी आपल्या घरी गणरायची प्रतिष्ठापना करताना दिसतात. बॉलीवूडचा सलमान खान(salman khan), शिल्पा शेट्टी (shilpa shetty) , जितेंद्र यांच्या घरचा गणेशोत्सव हा चाहत्यांचे नेहमी लक्ष वेधून घेताना दिसतो. सध्या अभिनेत्री कविता कौशिक (kavita kaushik) एक पोस्ट चर्चेत आली आहे. ती काही कारणास्तव बाप्पावर नाराज होती. तिनं आपली सोशल मीडियावर व्यक्त केली आहे. त्या कारणामुळे तिनं पाच वर्षे लाडक्या बाप्पाची प्रतिष्ठापना केली नव्हती. तिच्या त्या पोस्टला चाहत्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंटही दिल्या आहेत. सध्या सगळीकडे गणरायाच्या उत्सवाची धूम आहे. काही सेलिब्रेटी आपल्या गणरायाच्या उत्सवाच्या पोस्ट चाहत्यांना शेयर करत आहेत. त्यात कविता कौशिकची पोस्ट लक्षवेधी ठरताना दिसत आहे. कविताच्या वडिलांचे निधन झाले होते. त्यानंतर तिनं घरी बाप्पाची प्रतिष्ठापना बंद केली होती. त्याविषयी तिनं आपली प्रतिक्रिया दिली आहे.

कवितानं आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, मी भगवान शंकराकडे तक्रार केली होती. मी मनातल्या मनात त्याच्यावर खूप नाराजही होते. माझ्या वडिलांनी त्यांनी माझ्यापासून दूर केलं. याचा मला राग होता. काही गोष्टी अशा होत्या की, त्या 2016 पासून पूर्णपणे बदलल्या. मी त्यामुळे बाप्पाला घरी आणलं नाही. मी त्याच्यावर नाराज होते. त्यासंबंधी मी गणरायाच्या बाबा भगवान शंकर यांच्यावर चिडले होते. त्यामुळे मी ठरवलं की मी यापुढे त्यांच्या मुलाला घरी आणणार नाही. मात्र काही काळानं मला असं जाणवलं की, आपल्या सगळ्यांना त्या देवानं निर्माण केलं आहे. तोच आपला संरक्षणकर्ताही आहे. तोच आपल्यातील अनेक गुण दोष बाहेर काढत असतो.

कविता आपल्या पोस्टमध्ये म्हणते की, ज्यामुळे मला प्रेम मिळाले त्यासाठी मी काही देवाला धन्यवाद देणार नाही. जेवढं प्रेम मला माझे वडिल करायचे ते प्रेम मला काही पुन्हा मिळणार नाही. मात्र आता पुन्हा बदल झाला आहे. पाच वर्षांनंतर बाप्पा आमच्या घरी आला आहे. कविताच्या बाबत बोलायचे झाल्यास ती मनोरंजन क्षेत्रातील मोठी अभिनेत्री आहे. तिनं 2001 पासून आपल्या करिअरला सुरुवात केली होती. कुटूंब नावाच्या मालिकेत ती सर्वप्रथम दिसली. त्यानंतर तिनं अनेक टीव्ही शो मध्ये काम केलं. कविताचा एफआयआर नावाचा कॉमेडी शो प्रेक्षकांच्या पसंतीस पडला. त्या शो मध्ये तिनं जवळपास दहा वर्षे काम केलं होतं. टेलिव्हिजनवरील एक बोल्ड आणि बिनधास्त अभिनेत्री म्हणून कविताचे नाव घेतले जाते.

हेही वाचा: तिला घाबरुन ठेवू, त्याला सगळी सूट देऊ!, अभिनेत्री हेमांगीचा संताप

हेही वाचा: अभिनेता रमेश वलियासाला यांचे निधन, मृत्यूचं कारण अस्पष्ट

loading image
go to top