esakal | 'वडिलांच्या वयाचे आहेत ते..'; व्हिडीओमुळे नेटकऱ्यांनी केले कियाराला ट्रोल
sakal

बोलून बातमी शोधा

 kiara advani

'वडिलांच्या वयाचे आहेत ते..'; व्हिडीओमुळे नेटकऱ्यांनी केले कियाराला ट्रोल

sakal_logo
By
प्रियांका कुलकर्णी

ग्लॅमरस अभिनेत्री म्हणून ओळखली जाणारी कियारा अडवाणीने (kiara advani) नुकतेच बॉलिवूडमध्ये सात वर्षे पूर्ण केली आहेत. यानिमित्ताने कियाराने मोठे सेलिब्रेशन केले. कियारा आणि अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा (sidharth malhotra) यांच्या अफेअरची चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरू आहे. काही दिवसांपूर्वी कियारा सिद्धार्थच्या घरी गेली होती. त्यावेळी सिद्धार्थच्या घराबाहेरील कियाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. कियाराला या व्हिडीओमुळे ट्रोल केले जात आहे. व्हिडीओमध्ये असे दिसत आहे, की कियारा सिद्धार्थच्या घराबाहेर तिच्या गाडीमधून उतरते आणि एक वृद्ध गार्ड तिच्या कारचं दार उघडतो. शिवाय तिला सलामही करतो. या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट करत कियाराला ट्रोल केले आहे.(actress kiara advani car gate open elderly guard users got angry)

कियाराच्या या व्हिडीओला एका नेटकऱ्याने कमेंट केली, 'तू तुझ्या गाडीचं दार स्वत: उघडू शकत नाही का? त्या व्यक्तीचे वय तरी बघ'. एका युझरने लिहिले, 'वडिलांच्या वयाच्या व्यक्तीकडून सलाम घेतेस, लाज वाटत नाही का?' एकाने, 'शेम ऑन यू' म्हणत आपला संताप व्यक्त केला. हा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर मानव मंगलानी यांनी सोशल मीडियावर शेअर केला.

हेही वाचा: "अनिल कपूरचा मुलगा म्हणून माझा द्वेष करतात"; हर्षवर्धनची खंत

'कबीर सिंग' या चित्रपटामुळे कियाराला विशेष लोकप्रियता मिळाली. कियारा लवकरच ‘जुग जुग जियों’, ‘भूल भुलैया 2’ आणि ‘शेहशाह’ या चित्रपटांमध्ये दिसणार आहे. ‘शेरशाह’ या चित्रपटामध्ये कियारा आणि सिद्धार्थ दोघे एकत्र स्क्रिन शेअर करणार आहेत.

हेही वाचा: तापसीच्या आईवडिलांना सतावतेय तिच्या लग्नाची चिंता; "कोणाशीही लग्न कर पण.."

loading image