नशीब बलवत्तर म्हणून वाचल्या अभिनेत्री किशोरी शहाणे;काय झालं नेमकं?

अभिनेत्रीच्या कारला समोरून येणाऱ्या ट्रकने धडक दिल्यानं अपघात झाल्याचं वृत्त आहे.
Kishori Shahane
Kishori ShahaneGoogle

अभिनेत्री किशोरी शहाणे (Kishori Shahane) यांनी मराठी-हिंदी दोन्ही इंडस्ट्रीत आपल्या अभिनयाच्या माध्यमातून ओळख निर्माण केलेली आहे. त्या सध्या छोट्या पडद्यावर हिंदी मालिका 'गुम है किसी के प्यार में' मध्ये महत्त्वाची भूमिका साकारत आहेत. त्यामुळे अर्थातच घराघरात त्यांना आजही छोट्या पडद्यावर आवर्जुन पाहिलं जातं,पसंत केलं जातं. त्यांच्या संदर्भातील एक बातमी सध्या वाऱ्यासारखी पसरतेय ती म्हणजे गेल्या शनिवारी त्यांच्या कारला झालेल्या अपघाताची. हा अपघात इतका जबरदस्त होता की त्यांच्या कारच्या पुढील भागाचा संपूर्ण चक्काचूर झालेला आहे. मुंबईतील रस्त्यावर हा अपघात झाल्याची बातमी स्वतः किशोरी शहाणे यांनी इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत दिली. या अपघातात कारचं भारी नुकसान झालं असलं तरी देवाच्या कृपाने कुटुंबातील सगळे या भयानक अपघातातून बचावले असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

त्यांनी अपघाताचे(Accident) फोटो शेअर करीत म्हटलं आहे,''कारची अवस्था संपूर्णपणे बिघडली आहे पण माझं कुटुंब बचावलं. देवाची कृपा म्हणावी. देव तारी त्याला कोण मारी''. किशोरी शहाणे आपल्या कुटुंबासोबत मुंबई(Mumbai) बाहेर पिकनिकसाठी निघाल्या असताना हा अपघात झाल्याचं बोललं जात आहे. त्यांच्या या पोस्टला पाहून चाहत्यांनी चिंता व्यक्त केली आहे. त्यांच्यासोबत 'गुम है किसी के प्यार में' या मालिकेत काम करणारी अभिनेत्री यामिनी मल्होत्रानंही चिंता व्यक्त केली आहे. किशोरी शहाणे 'गुम है किसी के प्यार में' या मालिकेत भवानी चव्हाण ही महत्त्वाची व्यक्तिरेखा साकारत आहेत. त्या एक उत्तम अभिनेत्री असण्यासोबतच निर्मात्या आणि नृत्यांगना म्हणूनही प्रसिद्ध आहेत. त्यांनी याआधी शिर्डीच्या साईबाबांच्या जीवनावर आधारित एका सिनेमाची निर्मिती केली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com