Malaika Arora : 'बाई थोडं फाउंडेशन कमी कर!' अर्ध्या रात्री जाळीदार साडीत! |Actress Malaika Arora strappy blouse | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bollywood actress malaika arora news

Malaika Arora : 'बाई थोडं फाउंडेशन कमी कर!' अर्ध्या रात्री जाळीदार साडीत!

Malaika Arora Saree Look: मलायका ही नेहमीच तिच्या वेगवेगळ्या लूकसाठी ओळखली जाणारी सेलिब्रेटी आहे. गेल्या काही दिवसांपासून मलायकाच्या फोटोंना मिळणारा प्रतिसादही मोठा आहे. इंस्टावर मलायकाला फॉलो करणाऱ्यांची (Bollywood Actress Malaika) संख्याही मोठी आहे. आता मलायकाचा एक वेगळाच अंदाज सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामुळे तिला नेटकऱ्यांच्या गंमतीशीर प्रतिक्रिया मिळाल्या आहेत. भर रात्री मलायकाचा (Entertainment News) जाळीदार साडीतील तो अंदाज पाहून चाहते मात्र भारावून गेले आहेत.

मलायकाचा मेकअप चाहत्यांनी तिला काही प्रश्नही विचारले आहेत. वयाची चाळीशी पार केलेली मलायका ही तिच्या फिटनेससाठी ओळखली जाते. वेगवेगळ्या रियॅलिटी शोमधून नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेणाऱ्या मलायकाला फिटनेस फ्रीक म्हणूनही प्रसिद्धी मिळाली आहे. काही दिवसांपूर्वी तिचा बॉयफ्रेंड अर्जुन कपूरसोबतच्या फोटोंना सोशल मीडियावर मिळालेली प्रसिद्धी चर्चित ली होती. आता मलायकाचा जाळीदार साडीतील लूक पाहून नेटकरी भारावून गेले आहेत.

एका इव्हेंटमध्ये मलायका सहभागी झाली होती. इतरही सेलिब्रेटी त्या पार्टीमध्ये सहभागी झाले होते. मलायकाची ज्यावेळी त्या कार्यक्रमामध्ये इंट्री झाली तेव्हा मात्र तिनं सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. याप्रसंगी तिला काहींनी ट्रोल देखील केले आहे. बॉलीवूडमध्ये काही सेलिब्रेटी हे नेहमीच त्यांच्या हटक्या ड्रेसिंग सेन्समुळे चर्चेत असतात. त्यामध्ये मलायकाचे नाव घ्यावे लागेल. मलायकाचा तो लूक पाहिल्यावर अनेकांना फोटोचा मोह आवरला नाही. त्या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेल्या फोटोग्राफर्सची मलायकाचा फोटो घेण्यासाठीची लगबग त्या व्हिडिओमध्ये दिसून येते.

हेही वाचा: नुपूर शर्मांना सुप्रीम कोर्टाने फटकारल्यानंतर अग्निहोत्रींचे tweet Viral

काहींनी मलायकाच्या त्या लूकवर टीका केली आहे. काहींनी तिला एवढा लाऊड मेक अप का केला असा सवालही केला आहे. चेहऱ्य़ाचा रंग हा तिच्या बॉडीटोनशी मॅच करत नसल्याचे म्हटले आहे. थोडं कमी फाउंडेशन करत जा अशा शब्दांत काहींनी मलायकाला टोमणा मारला आहे.

हेही वाचा: Video: आपल्याला दोन्ही हातच नसेल तर?...

Web Title: Actress Malaika Arora Strappy Blouse With Net Transparent Saree Video Viral Social Media

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top