'बहुतांशी चित्रपटांच्या सिक्वेलमध्ये मिळतो गर्लफ्रेंडलाच रोल'

आपल्या बोल्डनेसनं तिनं एकेकाळी बॉलीवूडमध्ये वेगळी ओळख निर्माण केली होती.
mallika sherawat actress mumbai esakal news
mallika sherawat actress mumbai esakal news

मुंबई - आपल्या बोल्डनेसनं तिनं एकेकाळी बॉलीवूडमध्ये वेगळी ओळख निर्माण केली होती. मल्लिका गेल्या काही काळापासून बॉलीवूडपासून लांब आहे. त्याचे कारण तिला निर्माते आणि दिग्दर्शक यांच्याकडून आलेला वाईट अनुभव. आपल्या बिनधास्त वक्तव्यासाठी ती प्रसिद्ध आहे. त्यावरुन आपण किती का ट्रोल झालो तरी त्याची पर्वा करायची नाही. हे मल्लिकाला चांगले ठाऊक आहे. त्यामुळे ती नेहमी सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारची वक्तव्ये करताना दिसते. काही दिवसांपूर्वी तिनं आपल्याला हा देश सोडावा लागणार होता. त्याचे कारण पुरुषांपासून नव्हे तर महिलांनी आपल्याला विनाकारण लक्ष्य केले होते. अशी टीका तिनं केली होती. मात्र मी शांत होते. लोकांना काय बोलायचे ते बोलू देत. आताही मल्लिका पुन्हा चर्चेत आली आहे.

मर्डर पासून मल्लिका चर्चेत आली होती. तेव्हापासून तिनं प्रेक्षकांच्या मनात घर केलं. बोल्डनेससाठी मल्लिकाच्या नावाशिवाय आणखी कुठला पर्याय त्यावेळी निर्माते आणि दिग्दर्शक यांच्याजवळ नव्हता. मात्र त्याचाच एक वेगळा अनुभव मल्लिकानं शेयर केला आहे. त्यामुळे तिच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. केवळ पडद्यावरच नव्हे तर आपल्या सामाजिक जीवनातही मल्लिका ही तिच्या बिनधास्त स्वभावासाठी ओळखली जाते. त्याचे कारण तिचा आक्रमकपणा. मल्लिकानं आता तिच्या वेलकम बॅक चित्रपटाविषय़ीचा एक अनुभव सांगितला आहे. आपण वेलकम बॅकचा भाग का होऊ शकलो नाही, याचे कारण तिनं सांगितलं आहे. वेलकममध्ये मल्लिकानं इशिका नावाची भूमिका केली होती.

वेलकमच्या दुसऱ्या भागामध्ये देखील आपल्याला भूमिका मिळेल. अशी अपेक्षा मल्लिकाची होती. मात्र तसे झाले नाही. यावेळी जे झाले त्यामुळे ती नाराज झाली. त्याविषयी तिनं सांगितलं आहे. वास्तविक वेलकमच्या पहिल्या भागामध्ये असलेल्या मल्लिकाच्या भूमिकेला प्रेक्षकांनी पसंद केलं होतं. तिनं एका मुलाखतीमध्ये सांगितलं होतं की, जर वेलकमचा सिक्वेल तयार झाला तर त्यात दिग्दर्शक त्याच्या गर्लफ्रेंडलाच घेणार. आणि झालं तसचं जेव्हा वेलकम बॅकचा दुसरा भाग तयार झाला तेव्हा त्यामध्ये त्या दिग्दर्शकाच्या गर्लफ्रेंडनं भूमिका केली होती. केवळ एवढचं बोलून मल्लिका थांबलेली नाही. तिनं सांगितलं की, ये खरं आहे की, जेव्हा लोकं सिक्वेल तयार करतात त्यात ते त्यांच्या गर्लफ्रेंडलाच घेतात. त्याल मी काय करणार, असा प्रश्न तिनं यावेळी केला होता.

mallika sherawat actress mumbai esakal news
होय, भारतात लैंगिक भेदाभेद आहे - मल्लिका शेरावत
mallika sherawat actress mumbai esakal news
मल्लिका शेरावत म्हणतेय, 'ही बलात्काऱ्यांची भूमी....'

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com