'राज ठाकरे हे ट्रेण्ड चेंजर..' जाणून घ्या काय म्हणाले जॅकी श्रॉफ... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

jackie shrof on raj thackeray

'राज ठाकरे हे ट्रेण्ड चेंजर..' जाणून घ्या काय म्हणाले जॅकी श्रॉफ...

Jackie sroff : बॉलिवूड अभिनेते जॅकी श्रॉफ (jackie shroff) हे त्यांच्या बिनधास्त आणि बेधडक शैलीमुळे कायमच चर्चेत असतात. अत्यत खडतर परिस्थितीवर मात करून जॅकी यांनी बॉलिवूड गाजवले. त्यांच्य सामाजिक कामातून त्यांच्यातील माणूसकीचेही वारंवार दर्शन घडत आले आहे. ज्यांचा संबंध बॉलीवूडवर दरारा आहे असे जॅकी श्रॉफ यंदा चक्क मराठी भाषा आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) यांच्याविषयी बोलले आहेत.

हेही वाचा: PHOTO : हृता दुर्गुळेच्या हनिमूनचे 'ते' फोटो पाहिले का?

डॉ. संजय बोराडे यांच्या लहानमुलांमधील स्थुलता या विषयावरील 'जनरेशन XL या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा नुकताच पार पडला. या कार्यक्रमात मनसे अध्यक्ष राज ठाकरे, अभिनेता जॅकी श्रॉफ, ज्येष्ठ गायिका आशा भोसले (asha bhosle) इत्यादी दिग्गज मंडळी हजर होती. लोअर परळच्या कोरम क्लबमध्ये हा सोहळा पार पडला होता. या कार्यक्रमात बोलताना जॅकी श्रॉफ यांनी फिटनेसबाबत महत्वाचे विधान केले. (bollywood star jackie shroff comments on raj thackeray and marathi language)

हेही वाचा: 'रानबाजार'साठी माधुरी पवारने केलं टक्कल.. भलतीच गाजतेय भूमिका...

“डॉक्टर हे देवासारखे असतात. ते लहान मुलांवर अत्यंत प्रेमाने उपचार करतात. आपण आपल्या मुलांच्या आहाराकडे लक्ष द्यायला पाहिजे. कारण आपण त्यांना जे खायला देतो, त्याचा अप्रत्यक्षरित्या परिणाम त्यांच्या शरीरावर होतो. आहारात तेलकट पदार्थ मुलांना सहसा देऊ नये,' असे जॅकी श्रॉफ म्हणाले.

पुढे त्यांनी थेट मराठी भाषा आणि राज ठाकरे यांच्यावरच भाष्य केले. 'राज ठाकरे हे माझे फार जुने मित्र आहेत. त्यांनी मला फार आधी एक गोष्ट सांगितली होती. जर तुम्ही महाराष्ट्रात राहत असाल तर तुम्हाला मराठीत बोलता आलं पाहिजे. मला स्पष्ट मराठी बोलता येत नाही पण मी प्रयत्न करतो,' असे ते म्हणाले. तर 'माझा मित्र (राज) आता आजोबा झाला आहे. तुम्ही सुरकुत्या असलेले लोक आजोबा झालेले पाहिले असतील पण राज ठाकरे हे ट्रेंड चेंजर आहे. ते खूपच तरुण दिसतात,' असे कौतुक जॅकी श्रॉफ यांनी केले.

Web Title: Bollywood Star Jackie Shroff Comments On Raj Thackeray And Marathi Language

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..