esakal | राधिका म्हणाली, 'घरी बसावं लागलं तरी चालेल पण सर्जरी करणार नाही'
sakal

बोलून बातमी शोधा

 radhika madan

राधिका म्हणाली, 'घरी बसावं लागलं तरी चालेल पण सर्जरी करणार नाही'

sakal_logo
By
प्रियांका कुलकर्णी

'मेरी आशिकी तुमसे ही' या मालिकेमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण करणारी अभिनेत्री राधिका मदन तिच्या अभिनयाने नेहमीच प्रेक्षकांचे मनोरंजन करत असते. राधिकाच्या 'अंग्रेजी मिडीयम' या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. तसेच नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'रे' या सीरिजमधील 'स्पॉटलाईट' या फिल्ममधील तिच्या अभिनयाचं अनेकांनी कौतुक केलं. नुकताच राधिकाने 'ह्यूमन्स ऑफ बॉम्बे' या पेजला मुलाखत दिली. मुलाखतीमध्ये राधिकाने तिच्या बालपणीच्या आठवणी सांगितल्या. तसेच तिने अभिनय क्षेत्रात येताना ज्या संकटांचा सामना केला, त्याबद्दल देखील सांगितले. या विशेष मुलाखतीमध्ये तिने चाहत्यांना स्वत:वर प्रेम करण्याचा सल्ला देखील दिला आहे.

राधिकाने सांगितली लहाणपणीची आठवण

मुलाखतीमध्ये राधिकाने सांगितले की ती लहाणपणी खूप खोडकर होती. तिला खूप आनंदी राहायची, तसेच तिच्या दिसण्यामुळे तिला मुलांचे अटेंशन मिळत नसत. तिने सांगितले, 'मला वाटायचे की मी खूप सुंदर आहे. जर मला कोणी विचारले की, तुला मोठी होऊन काय व्हायचे आहे. तर मी म्हणायचे मला लग्न करायचे आहे. ला लग्नातील तामजाम खूप आवडायचा. पण नंतर मी डान्समध्ये करियर करायचे आणि मोठे होण्याचे स्वप्न पाहिले.'

वयाच्या 17 व्या वर्षी केली करियरला सुरूवात

राधिकाने तिच्या अभिनय क्षेत्रातील करियरची सुरूवात 17 व्या वर्षी केली.य त्याबद्दल तिने सांगितले, 'मी 17 वर्षांची असताना एका टिव्ही शोसाठी ऑडिशन दिली. त्याच्या नंतर 3 दिवसांनी मी शूटिंगसाठी मुंबईमध्ये राहायला आले. माझ्यासाठी ते खूप कठीण होते. मी त्यानंतर काम करत राहिले मला मालिकांच्या खूप ऑफर येत होत्या. मी 19 वर्षांची असताना स्वत:ला सांगितले होते की, जर तू तुझ्या कम्फर्ट झोनमध्ये राहिलीस तर तू इथेच अडकून राहशील.' त्यानंतर तिने चित्रपटांसाठी ऑडिशन दिल्या.

हेही वाचा: 6 years for Baahubali: 'या' कारणांमुळे सुपरहिट ठरला 'बाहुबली'

सर्जरी करण्याचा दिला होता सल्ला

राधिकाने तिचा चित्रपटांच्या ऑडिशनचा अनुभव सांगितला ती म्हणाली, 'मी चित्रपटांसाठी ऑडिशन द्यायला लागले. पण सर्वांनी रिजेक्ट केले. मला काही लोकांनी सांगितले होते की तुला एका साईज आणि शेपमध्ये येण्यासाठी सर्जरी करावी लागेल पण मला असे वाटतं नव्हते. मला असे वाटायचे की मी खूप सुंदर आहे. मी का या लोकांचे ऐकू? त्यानंतर मला दिड वर्षे काम मिळाले नाही. त्यावेळी मला माझ्या कामावर शंका येऊ लागली. पण मला माहित होतं की माझं ध्येय खूप महत्वाचे आहे. मी खूप ऑडिशन दिल्या. मला आठवते की, मी एका चित्रपटात वयस्कर दिसण्यासाठी 12 किलो वजन वाढवले होते आणि त्याचं महिन्यात मी 17 वर्षाच्या मुलीची भूमिका असणारा चित्रपट केला. माझं एकच ध्येय होते की कोणतेही काम केले तरी ते मजा घेऊनच करावे. मला वाटते स्वत:वर प्रेम करणे ही यशाची गुरूकिल्ली आहे.'

हेही वाचा: 'हे माझं तिसरं मूल'; करीनाने शेअर केला सोनोग्राफीचा फोटो

loading image