१० वर्षांच्या सहवासानंतर ही प्रसिद्ध जोडी झाली विभक्त

POOJA GOR
POOJA GOR

मुंबई-  सिनेइंडस्ट्री म्हटलं की यात गॉसिप, अफेअर-ब्रेकअप, डेटिंग, घटस्फोट, अफवा या सगळ्या गोष्टी आपसूकंच येतात. आतापर्यत सिनेइंडस्ट्रीतील कित्येक जोडप्यांचे अफेअरर्स आणि ब्रेकअप सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनले आहेत. यामध्ये  टीव्ही इंडस्ट्रीतील संजीदा शेख- आमिर अली. ऋत्विक धन्जानी- आशा नेगी या सेलिब्रिटी जोड्यांचं ब्रेकअप सगळ्यात जास्त जास्त चर्चेत राहिलं आहे. मात्र, या जोड्यांनंतर आता आणखी एक प्रसिद्ध जोडी विभक्त झाली आहे. तब्बल १० वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर या जोडीने ब्रेकअपचा निर्णय घेतला आहे. 

‘प्रतिज्ञा’ या प्रसिद्ध मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री पूजा गौर आणि अभिनेता राज सिंह अरोरा हे विभक्त झाले आहेत. तब्बल १० वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर या जोडीने ब्रेकअपचा निर्णय घेतल्याने त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.  याविषयी पूजाने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे. “२०२० या वर्षात अनेक बदल पाहायला मिळाले. चांगलं होतं आणि नव्हतंही. गेल्या काही दिवसांपासून माझ्या आणि राजच्या नात्याविषयी अनेक चर्चा रंगत होत्या. त्यामुळे याविषयी व्यक्त होण्यापूर्वी मला थोडा वेळ हवाय. राज आणि मी, आम्ही दोघांनीही वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. भलेही यापुढे आमचे रस्ते वेगळे असतील. मात्र, आमच्यातील मैत्री, प्रेम कायम असेल. त्याचं सगळं चांगलं व्हावं ही एकच इच्छा माझी कायम असेल”,असं पूजाने म्हटलंय.

ती पुढे म्हणते की, “यापुढेही आमच्यातली मैत्री कायम असेल आणि ती कधीच बदलणार नाही. याविषयी व्यक्त होण्यासाठी मला बराच वेळ आणि धैर्य लागलं. पण आता यापुढे मी काहीच बोलू शकत नाही. धन्यवाद”.

२०१९ मध्ये पूजा आणि राज यांच्या ब्रेकअपच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र या अफवा असल्याचं म्हणत पूजाने ती बातमी फेटाळून लावली होती. पूजा ही छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने ‘सावधान इंडिया’, ‘एक नई उम्मीद – रोशनी’, ‘प्रतिज्ञा’ यांसारख्या मालिकांमध्ये काम केलंय. तर ‘केदारनाथ’ या सिनेमात सारा अली खानच्या मोठ्या बहिणीची भूमिका साकारली होती.

actress pooja gors post confirming break up with raj singh arora goes viral

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com