Priya Bapat:'मदर्स डे'च्या वडिलांना शुभेच्छा,प्रिया बापटची खास पोस्ट चर्चेत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Priya Bapat wishing her father on Mother's Day

'मदर्स डे'च्या वडिलांना शुभेच्छा,प्रिया बापटची खास पोस्ट चर्चेत

मराठीतील चित्रपटांमुळे प्रिया बापट ही आघाडीची अभिनेत्री आहे.तीच्या दिलखेचक अदांनी ती प्रेक्षकांचे लक्ष कायम वेधून घेत असते.तीच्या सोशल मीडिया पोस्टला नेटकऱ्यांचा विशेष प्रतिसात मिळतो.उत्तम अभिनयसोबतच प्रिया तिच्या सौंदर्यामुळेही चर्चेत असते.आज मदर्स डे.आजच्या दिवशी जेथे सगळ्यांनी त्यांच्या आईंवर एखादी पोस्ट टाकत शुभेच्छा दिल्या आहेत तेथे प्रिया तीच्या वडिलांना मदर्स डे च्या शुभेच्छा देत आहे.

प्रिया बापटने तीच्या इन्स्टाग्राम अकाऊंटला तीच्या आईवडिलांचा फोटो टाकत एक पोस्ट शेअर केली आहे.या पोस्टमधे तीने तीच्या आईवडिलांच्या संघर्षाबाबत थोडक्यात लिहीले आहे.या पोस्टमधे तीने तीच्या आईवडिलांचे कौतुक केले आहे.त्यासोबत तिने तिचा जुना फॅमिली फोटोही पोस्ट केला आहे.तीच्या या पोस्टमधे तीने अतिशय भाऊक कॅप्शन लिहीले आहे.

प्रिया बापटच्या खास पोस्टचे कॅप्शन

"बाबा, वडील म्हणून, मुलगा म्हणून तुम्ही बेस्ट आहातच आणि कायम असाल. पण, तुमच्या आणि आईच्या ३८ वर्षांच्या संसारात तुम्ही सर्वांत बेस्ट होतात. आर्थिक बाजू तर तुम्ही सांभाळलीच पण सांसारिक सर्व जबाबदार्यांमधे तुमच्या आणि आईच्या पार्टनरशिपला तोड नाही.मुलांचे लाडही दोघांनीही केले आणि आोरडाही दोघांनीही दिला. शाबासकी, कौतुक दोघांनी केलं. अगदी आई घरी नसताना स्वयंपाकाही केलात आणि कधीही अवलंबून न राहण्याची शिकवण दिलीत. आर्थिक अडचण आोढवल्यावर मॅट्रीकही न झालेली आईने घराबाहेर पडून तुमच्या बरोबरीने काम करून आर्थिक जबाबदारी पार पाडली. एरवी नाजूक तब्बेतीची आई तुम्हाला जरा बरं नाहीसं झालं तर सगळं बळ एकवटून झाशीची राणी व्हायची. आणि आईसाठी तुम्ही जे गेली ३ वर्ष केलत, तिची सेवा, प्रेम ते क्वचितच कोणी नवरा आपल्या बायकोसाठी करत असेल. इतकं निस्वार्थ प्रेम."

पुढे ती कॅप्शनमधे लिहीते,"तुम्हा दोघाची मुलं म्हणून श्वेता आणि मी जन्माला आलो, तुमच्या सारख्या आई वडिलांची सेवा करता येणं हेच आमच्या जन्माचं सार्थक आहे.आईची कमतरता कायमच जाणवेल. आज तुमच्या वाढदिवशी Mother’s Day आहे म्हणून दोन्ही शुभेच्छा तुम्हालाच.आईकडे आता जादूची कांडी आहे, तुमच्या कडे आशिर्वाद आहेत. ते दोन्ही आमच्या पाठीशी असू देत. तुम्हाला उत्तम आरोग्य आणि दिर्घायुष्य लाभो."