Priyanka Chopra's Mother Birthday: एक फ्रेम तीन पिढ्या..आईच्या वाढदिवशी प्रियंकाने दाखवली मुलीची झलक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Priyanka chopra showed her baby on the occasion of her mother's birthday

'एक फ्रेम तीन पिढ्या'..आईच्या वाढदिवशी प्रियंकाने दाखवली मुलीची झलक

देसी गर्ल प्रियंकाचा देश-विदेशात मोठा चाहता वर्ग आहे.(Priyanka Chopra)तिच्या स्टाईल आणि मनमोहक अदांनी तिच्या चाहत्यांना ती कायम प्रभावित करत असते.प्रियंकाच्या आईचा तिच्या करियरमधे मोठा वाटा आहे असं ती कायम सांगत असते.(Birthday)आज तिच्या आईचा वाढदिवस.आईच्या वाढदिवसाच्या निमित्तानं प्रियंकानं आईसाठी भाऊक पोस्ट लिहीली आहे.

बॉलीवुड अभिनेत्री प्रियंकाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिच्या आई आणि बाळासह एक फोटो शेअर केलाय.या फोटोमधे एकाच फ्रेममधे नेटकऱ्यांना तीन पिढ्या दिसल्या.प्रियंका,प्रियंकाची आई आणि तिची मुलगी या पोस्टमधे बघायला मिळतेय.फोटोचं नेटकऱ्यांनी कौतुकही केलं.प्रियंकानं तिच्या आईसाठी खास पोस्ट लिहत हा फोटो टाकलाय.

प्रियंका आणि नीक जोनसच्या (NIck Jonas)बाळाचा जन्म सरोगसीच्या माध्यमातून झालाय.मध्यंतरी त्यांच्या मुलीची प्रकृतीही बरी नव्हती.रूग्णालयातून मुलगी घरी आल्यानंतर प्रियंकाने मालतीची एक झलक चाहत्यांना इन्स्टा पोस्टमधूनच दाखवली होती.

प्रियंकाची मुलगी 'मालती मैरी' हिची एक झलक बघण्यासाठी चाहते आतुर असतात.प्रियंकाच्या आईच्या वाढदिवसाच्या निमित्ताने परत एकदा चाहत्यांना प्रियंकाच्या मुलीची एक झलक बघायला मिळाली.त्यामुळे चाहत्याना आनंदही झालाय.तिच्या या पोस्टावर अनेक सेलिब्रिटींनी कमेंट केले आहेत.

Web Title: Actress Priyanka Chopra Shared A Post For Her Mothers Birthday Her Girl Malati Marry Is Seen With Her Mother In The Picture

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top