esakal | 'जे झालं ते चांगलचं, मला फार आनंद झालायं'...
sakal

बोलून बातमी शोधा

actress rakhi sawant

'जे झालं ते चांगलचं, मला फार आनंद झालायं'...

sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - अभिनेत्री कंगणा राणावतला (kangana ranaut) व्टिटरनं (twitter) चांगलीच अद्दल घडवली आहे. सततच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे कंगणाचं व्टिटर अकाऊंट रद्द करण्यात आलं आहे. त्यावरुन कंगणावर जगभरातून टीका करण्यात आलीयं. नेटक-यांनी तिला ट्रोल केले आहे. बॉलीवूडमधील अनेक कलाकारांनी याबाबत समाधान व्यक्त केलं आहे. याचे महत्वाचे कारण म्हणजे तिचे प्रत्येक सेलिब्रेटीशी असलेले टोकाचे संबंध. याचा फटकाही कंगणाला बसला आहे. आता तिच्या विरोधात आणखी एका अभिनेत्रींन बोलण्यासाठी पुढाकार घेतला आहे. तिचं नाव आहे राखी सावंत. (rakhi sawant) तिनं आपल्या सोशल मीडियावरुन कंगणावर टीका केलीय.

राखीनं (rakhi sawant) सोशल मीडियावर जी पोस्ट शेअर केली आहे त्यात तिनं म्हटलं आहे की, देशाबरोबर गद्दारी करु नये. आणि तसंही कंगणानं जे काही केलं आहे त्याची शिक्षा तिला मिळाली आहे. त्यामुळे मला वाटतं त्या व्टिटरवाल्यांनी जे केलं ते बरोबर होतं. त्यांचं काही चूकलं नाही. वास्तविक राखी आणि कंगणा या दोन्ही अभिनेत्री या त्यांच्या परखड स्वभावाबद्दल प्रसिध्द आहे. सोशल मीडियावर सर्वात अॅक्टिव्ह असण्यात त्यांचे नाव घ्यावे लागेल. राखीही कंगणाला जशास तसे उत्तर देण्यासाठी ओळखली जाते. दुसरीकडे कंगणाच्या वाचाळपणाबद्दल नव्यानं काही सांगण्याची गरज नाही.

हेही वाचा: प्रसिध्द संगीतकार वनराज भाटिया यांचे निधन

हेही वाचा: शिल्पाच्या अख्ख्या कुटूंबाला कोरोना, पोस्ट शेअर

बिग बॉसचा यंदाचा सीझन राखीनं आपल्या करामतीनं गाजवला. असं म्हणायला हरकत नाही. अनेकजण राखीला ड्रामा क्वीन असं म्हटलं जातं. दुसरीकडे कंगणा वादग्रस्त अभिनेत्री म्हणून प्रसिध्द आहे. राखी म्हणाली, तिचं व्टिटर अकाउंट बंद झालं हे एका अर्थी चांगलचं झालं आहे. काहीही बोलून देशात वेगळ्या प्रकारचे वातावरण तयार करणं चूकीचे आहे. आपल्याला लढायचे नाही. आपण सर्वच एकाच देशाचे नागरिक आहोत. त्यामुळे आपण अशाप्रकारची कॉमेंट करता कामा नये. असेही राखीनं (rakhi sawant) म्हटलं आहे.