शिल्पाच्या अख्ख्या कुटूंबाला कोरोना, पोस्ट शेअर

कोविड १९ चा कहर सर्वांसाठी डोकेदुखीचा विषय ठरतो आहे.
shilpa shetty kundra family
shilpa shetty kundra familyTeam esakal

मुंबई - कोरोनाचा कहर सतत वाढतो आहे. त्याला सामोरं जाताना सर्वांची दमछाक होत आहे. अशावेळी काय करावं असा प्रश्न सर्वांना पडला आहे. एकीकडे प्रशासनाची लढाई सुरु आहे. त्यांनी युध्दपातळीवर प्रयत्न सुरु केले आहे. आता सर्वांना कोरोनाचं व्हॅक्सिन देण्यात येत आहे. ते घ्यावे यासाठी नागरिकांना सेलिब्रेटींकडून आवाहनही करण्यात येत आहे. बॉलीवूडमध्येही कोरोनाचा मोठ्या प्रमाणात शिरकाव झाला आहे. प्रसिध्द अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या (shilpa shetty) फॅमिलीला कोरोना झाल्याची माहिती सोशल मीडियावर शेअर करण्यात आली आहे. शिल्पानं (shilpa shetty) ही पोस्ट शेअर केली आहे.

कोविड १९ चा कहर सर्वांसाठी डोकेदुखीचा विषय ठरतो आहे. यापूर्वी बॉलीवूडमधील अनेक सेलिब्रेटींना कोरोनाची लागण झाली होती. त्यांनी घरातच क्वॉरंनटाईन होण पसंद केले आहे. कित्येकांनी आपल्या चाहत्यांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. त्यात यापुढील काळ हा अतिशय खडतर असून सर्वांना खबरदारी घ्यावी लागेल असे कलाकारांनी सांगितले आहे. आपल्या वेगवेगळ्या पोस्टमुळे सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असणारी सेलिब्रेटी म्हणून शिल्पाच्या (shilpa shetty) नावाचा उल्लेख करावा लागेल. सध्या तिच्या पोस्टची जोरदार चर्चा सुरुयं.

शिल्पानं (shilpa shetty) आपल्या इंस्टाग्रावर लिहिलं आहे की, गेल्या दहा दिवसांपासून आमच्या परिवारासाठी मोठा कठीण काळ आहे. माझे सासु आणि सासरे हे कोविड १९ च्या विळख्यात सापडले आहेत. त्यानंतर मुलगी समीशा, मुलगा वियान, माझी आई आणि माझे पती राज यांनाही कोरोना झाला आहे. त्यामुळे सर्वांची चिंता वाढली आहे. आता सर्वजण आपआपल्या खोलीमध्ये विलगीकरणात आहे. त्या सर्वांची काळजी घेण्याची जबाबदारी माझ्यावर आहे. आता सर्वांना डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार केले जात आहे.

shilpa shetty kundra family
कर्जतच्या एनडी स्टुडिओत अग्नितांडव; 'जोधा अकबर'चा सेट जळून खाक
shilpa shetty kundra family
रामदेव बाबांच्या 'कोरोनिल'वर टीका करणारा चेतन भगत ट्रोल

शिल्पानं (shilpa shetty) लिहिलं आहे की, आमच्या घरातील अन्य दोन सदस्यांनाही कोरोना झाला आहे. त्यांच्यावरही उपचार सुरु आहेत. मी तर देवाला प्रार्थन केली आहे की, आम्हाला लवकरात लवकर या संकटातून वाचव. माझी कोरोनाची चाचणी निगेटिव्ह आली आहे. शासनानं सांगितलेल्या सर्व नियमांचे पालन करण्यावर आम्ही भर दिला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com