Raveena Tandon: फिल्ममेकरची मुलगी असूनदेखील सेटवर इंटर्नशिप दरम्यान कराव्या लागल्या होत्या उलट्या साफ,रविना तंडनचा धक्कादायक खुलासा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Raveena Tandon revealed her old experience from film industry

या प्रसिद्ध अभिनेत्रीने एकेकाळी सेटवर लोकांची उलटी साफ केली होती,काय आहे किस्सा..

दिसायला सुंदर आणि अभिनयाने ९०च्या दशकात प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी रविना तंडन कोणाला माहिती नसणार.(Bollywood)तीच्या सौदर्याने आजही अनेकांना भुरळ पडते.रविना तीच्या अभिनयाचे,तीच्या अनुभवाचे किस्से मीडियापुढे अनेक मुलाखतींमधून सांगतच असते.पण यावेळी तीने सांगितलेला किस्सा खरोखरच तुम्हाला हादरवून सोडेल.रविना तंडन ही प्रसिद्ध फिल्ममेकर रवी तंडन यांची मुलगी आहे.तरी मात्र तीचा चित्रपट सृष्टीतील प्रवास सोपा नव्हता.

रविना दहावीत असताना तीने प्रल्हाद कक्कर या अॅड फिल्ममेकरकडे इंटर्नशिपला सुरूवात केली होती.(Raveena Tandon)त्यादरम्यान तीला सेटच्या स्टॉलवरचं काही उरलेलं असो वा मग अजून काही.तीला ही सगळी कामं करावी लागली.एवढेच नव्हे तर त्यावेळी तीने उलट्या सुद्धा पुसल्या आहेत.स्टुडिओची फरशी पुसण्यापर्यंतचे काम तीने इंटर्नशिपला असताना केले आहे असा खुलासा तीने केलाय.

हेही वाचा: Raveena Tandon च्या मुलीचा ग्लॅमरस लूक

हे सगळं करत असताना तीला काहींनी मॉडेलींग क्षेत्रात जाण्याचे सल्लेही दिले होते.पण रविनाने त्यांचा कधी विचार केला नाही.ती म्हणते, त्यावेळी मला अनेकांनी तर प्रश्न सुद्धा केले की,पडद्यामागे काय करते आहे,तुझी खरी जागा खरं तर ऑन स्क्रिन असायला हवी.त्यावेळी माझे उत्तर असायचे,नाही नाही..मी आणि अॅक्ट्रेस..?पण नंतर जेव्हा तीने मॉडेलींगचा सल्ला मनावर घेतला तेव्हा तीला प्रल्हादनेच मॉडेलींगसाठी विचारले.पण तीने प्रल्हादकडे फुकट काम करण्याएवजी मॉडेलींग करुन पैसा कमावण्याचं ठरवलं.

हेही वाचा: 'अप्सरा हो तुम, या कोई परी'; निळ्या साडीत धक-धक गर्लचा Glamorous लूक

रविनाने तीचा पहिला चित्रपट पत्थर के फुल करत बॉलीवूडमध्ये पदार्पण केले.त्यानंतर तीला अनेक चित्रपटांत संधी मिळत गेली.दिलवाले,लाडला,अंदाज अपना अपना अशा अनेक चित्रपटांतून नंतर तीने प्रेक्षकांचे लक्ष वेधले.

Web Title: Actress Raveena Tandon Revealed Her Shocked Experience In An

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top