Supriya Pathare: दीड महिन्याच्या बाळाला घरात ठेवून मी.. सुप्रिया पाठारेंनी सांगितला 'तो' प्रसंग..

अभिनेत्री सुप्रिया पाठारे यांचा आज वाढदिवस, त्यानिमित्ताने जाणून घेऊया हा खास किस्सा..
actress Supriya Pathare birthday career struggle family children serial movie
actress Supriya Pathare birthday career struggle family children serial movie sakal

supriya pathare birthday: मराठी मनोरंजन विश्वातली एक लोकप्रिय आणि घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे सुप्रिया पाठारे. सुप्रिया यांनी आजवर अनेक मालिका, चित्रपट, नाटक यामध्ये महत्वाच्या भूमिका केल्या आहेत.

कधी विनोदी भूमिका करत भरभरून हसवलं तर कधी नकारात्मक भूमिका करून सर्वांचं लक्ष वेधलं. मालिका विश्वात तर सुप्रियाताई म्हणजे अगदी मुरलेल्या अभिनेत्री. सध्याही त्या 'ठिपक्यांची रंगोळी' या मालिकेत काम करत आहेत.

आज जरी त्या अत्यंत प्रसिद्ध अभिनेत्री असल्या तरी एक काळ असा होता की त्यांनी अत्यंत खडतर दिवस काढले आहेत. अगदी लोकांच्या घरची धुनी भांडी करण्याचे कामही त्यांनी केले आहे. त्यांच्या नाजुक परिस्थिती मुले त्या आपल्या दीड महिन्याच्या बाळाही घरी सोडून जात होत्या.

आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया हा किस्सा आणि त्यांची स्ट्रगल स्टोरी..

(actress Supriya Pathare birthday career struggle family children serial movie )

actress Supriya Pathare birthday career struggle family children serial movie
Nagraj Manjule: नागराज मंजुळे यांना मिळालेला राष्ट्रीय पुरस्कार चोरीला.. आता उघडकीस आली संपूर्ण घटना..

या प्रसंगाविषयी त्या एका मुलाखतीत म्हणाल्या होत्या, '' मला दोन मुलं आहेत. एक मुलगा आणि एक मुलगी. पहिला मुलगा झाला. मुलाचा जन्म झाला तेव्हा माझी घरची परिस्थितीही म्हणावी तेवढी चांगली नव्हती. अनेक आर्थिक अडचण होत्या.''

''त्यामुळे मी अगदी एक-दीड महिन्यांतच घराबाहेर पडले. लगेचच नाटक, मालिकांमध्ये काम करण्यास सुरवात केली. माझ्याकडे दुसरा पर्यायही नव्हता. मी स्वतःला फार नशीबवान मानते, की आई झाल्यानंतरही माझ्या क्षेत्रात काम करताना मला घरच्यांचा फार पाठिंबा मिळाला. कुटुंबाची जबाबदारी, चित्रीकरणाच्या वेळा सांभाळणं म्हणजे तारेवरची कसरतच. पण यादरम्यान माझी आई माझ्या पाठी खंबीरपणे उभी राहिली.'' 

''मी माझ्या लहानशा मुलाला आईकडे सोडून नाटकांचे दौरेही करत होते. तेव्हा जवळपास १५ ते २० दिवसांचा नाटकाचा दौरा असायचा. माझ्या बाळाला मुलांना बेबी सीटिंगला ठेवायचं नाही, हे माझं आणि माझ्या नवऱ्याच ठरलेलं होतं.''

''बरेच दिवस नाटकाच्या दौऱ्यानिमित्त मी बाहेरगावी गेली की, मला मुलाची फार आठवण यायची. जीव कासावीसही व्हायचा. कारण शेवटी आईचं मन आहे, पण त्यातूनही मी स्वतःला सावरलं.''

''मला माझ्या मुलाला तेव्हा फारसा वेळही देता आला नाही, याची थोडी खंत वाटते. त्याच्याबरोबर त्याचं बालपण मला जगता आलं नाही. पण त्यानंही कधी माझ्याकडं कोणता हट्ट केला नाही किंवा आई जवळच असली पाहिजे, असा त्याचा आग्रहही नसायचा. मी या कलाक्षेत्रात प्रेग्नंसीनंतर कमबॅक केलं, ते माझ्या आई आणि कुटुंबामुळेच. मी आज मी जे आहे त्यात माझ्या घरच्यांचा मोठं पाठिंबा आहे.'' असा प्रसंग सुप्रिया पाठारे यांनी सांगितला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com