डॉ.अमोल कोल्हेंना तेजस्विनी पंडितचा मानाचा मुजरा,कारणही तसंच...

खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या पोस्टवर अभिनेत्रीनं दिलेली प्रतिक्रिया चर्चेत
Tejaswini Padit & Dr.Amol Kolhe
Tejaswini Padit & Dr.Amol KolheGoogle

डॉ.अमोल कोल्हेंचा(Dr.Amol Kolhe) अभिनय क्षेत्रातला प्रवास हा त्याच्या अनेक भूमिकांच्या माध्यमातनं लक्षात राहिला खरा,पण त्यानं साकारलेली छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका मात्र आजही नजरेसमोरनं हटत नाही. त्यानंतर छत्रपती संभाजी साकारण्याचं धाडस करणाराही अमोल कोल्हेच. अनेक वादांनी मालिकेला जखडण्याचा प्रयत्न केला पण अमोल मागे हटला नाही. त्यानं जीव ओतून त्याच्या प्रत्येक ऐतिहासिक भूमिकेचं सोनं केलं. आता तो एका पक्षाचा खासदार झाला असला तरी त्याचं अभिनय प्रेम मात्र कायम जपण्याचा मानस त्यानं केलाय. हे दिसून येतं जेव्हा आजही तो एखादी भूमिका साकारताना दिसतो किंवा अभिनय क्षेत्राविषयी आस्थेनं बोलतो तेव्हा.

आता काल-परवा त्यानं एक पोस्ट शेअर केली अन् ती चर्चेत आली. त्यानं एक फोटो पोस्ट केलाय जो पाहताच कळालं डॉ.अमोल कोल्हे पुन्हा एका ऐतिहासिक भूमिकेत,त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे सर्वप्रिय शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार. सोशल मीडियावर या पोस्ट नंतर चर्चा रंगू लागल्या आहेत. त्याच्या पोस्टवर अनेक सेलिब्रिटींपासून चाहत्यांपर्यंत प्रतिक्रियांचा नुसता पाऊस पाडलाय. डॉ.अमोल कोल्हे आता शिवाजी महाराजांची भूमिका साकारताना आपल्याला सोनी मराठी वाहिनीवर दिसणार आहेत. अमोलच्या पोस्टवर अभिनेत्री तेजस्वीनी पंडितनं दिलेली प्रतिक्रिया लक्षवेधी ठरतेय. ती म्हणाली आहे,''Sirrr,आमचं राजं,द बेस्ट वन'',एकप्रकारे तिनं अमोलला मानाचा मुजराच केला आहे. एक अभिनेता म्हणूनही आणि अर्थातच तो शिवाजी महाराजांच्या भूमिकेत पुन्हा दिसणार म्हणूनही.

Tejaswini Padit & Dr.Amol Kolhe
फरहान-शिबानीचं मराठी लग्न; 'या' महाराष्ट्रीयन विधींनी रंगणार सोहळा

या मालिकेचं नाव आहे 'स्वराज्य सौदामिनी ताराराणी'. या मालिकेचं प्रमोशनही अमोलनं केलं होतं कारण तो स्वतः या मालिकेचा निर्माता देखील आहे. या मालिकेतनं पुन्हा शिवाजी महाराज साकारण्यासाठी आपण उत्सुक असल्याचं त्यानं पोस्टमध्ये म्हटलं आहे. सोमवार ते शनिवारी संध्याकाळी ७.३० च्या सुमारास ही मालिका आपण पाहू शकणार आहात. मालिकेत आता शिवाजी महाराजांचं पात्र नव्यानं येत आहे ,त्यात ते डॉ.अमोल कोल्हे साकारत आहे यासाठी चाहत्यांमध्ये उत्सुकता पहायला मिळत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com