फरहान-शिबानीचं मराठी लग्न; 'या' महाराष्ट्रीयन विधींनी रंगणार सोहळा

हे मराठमोळं लग्न २१ तारखे ऐवजी दोन दिवस आधी खंडाळा इथे पार पडणार आहे.
Farhan AKhtar, Shibani Dandekar
Farhan AKhtar, Shibani DandekarInstagram

बॉलीवूड(Bollywood) अभिनेता फरहान अख्तर(Farhan Akhtar) आणि त्याची गर्लफ्रेंड शिबानी दांडेकर(Shibani Dandekar) लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. दोघं गेल्या ३ वर्षांपासून एकमेकांना डेट करीत आहेत. २१ तारखेला ते सिनेइंडस्ट्रीतील काही ठराविक जणं आणि जवळच्या नातेवाईकांच्या उपस्थित रीसेप्शन करणार असल्याचं आता कळत आहे. पण त्याआधी हे दोघे महाराष्ट्रीयन पद्धतीनं लग्न करणार असल्याची मोठी बातमी समोर आली आहे. हे लग्न फरहान अख्तरच्या खंडाळा येथील फार्महाऊस वर या शनिवारी होणार असल्याचं बोललं जात आहे. आता लक्ष आहे ते मराठमोळ्या पेहरावात फरहान अख्तर आणि मॉर्डन शिबानी कसे दिसतायत त्याकडे...

Farhan AKhtar, Shibani Dandekar
Photo Challenge:अनुपम खेर बाथटबमध्ये...? बिचारे नेटकरी लागलेयत कामाला

एका इंग्रजी वेबसाईटला मिळालेल्या माहितीनुसार २१ तारखेला सर्व लोकांच्या उपस्थितीत लग्नसोहळा पार पडणार असला तरी त्याआधी फरहान अख्तरच्या खंडाळा येथील फार्म हाऊसवर १९ फेब्रुवारीला महाराष्ट्रीयन पारंपरिक पद्धतीत ते दोघे लग्न करणार असल्याचं बोललं जात आहे. सूत्रांनुसार कळतंय की शिबानी दांडेकर आणि फरहान अख्तरचे कुटुंबिय लग्नाला घेऊन खूपचं सतर्क असल्याचं बोललं जात आहे. आणि ही सतर्कता फक्त मीडिया लग्नाच्या ठिकाणी पोहोचू नये यासाठी घेतली जात आहे. लग्नासाठीची निमंत्रणं पाहुण्यांना पोहोचली आहेत. पण या बातमीवर मात्र कन्फर्मेशन मिळालं आहे की हे दोघे महाराष्ट्रीयन पद्धतीनं लग्न करणार आहेत. सांगितलं जात आहे की १८ तारखेला शिबानी आणि फरहानचे कुटुंबिय खंडाळासाठी रवाना होणार आहेत. एक दिवस हा सोहळा तिथं रंगणार असल्याचं बोललं जात आहे. शिबानीची मोठी बहिण अनुषानं शिबानीच्या लग्नाआधीच्या बॅचलर पार्टीची आणि प्री-वेडिंग सोहळ्याची जबाबदारी उचलली आहे. हे सोहळे रंगणार आहेत १७ आणि १८ फेब्रुवारी दरम्यान.

हे दोघे नेहमीच आपल्या प्रेमाची कबुली द्यायला मागेपुढे पाहत नाहीत. सोशल मीडियावर त्यांचे रोमॅंटिक फोटो देखील ते अनेकदा पोस्ट करताना दिसतात. फरहानचं हे दुसरं लग्न आहे. त्याचं पहिलं लग्न २००० साली झालं होतं. १७ वर्ष संसार केल्यानंतर तो पहिल्या पत्नीपासून विभक्त झाला. आणि त्यानंतर २०१९ मध्ये शिबानी त्याच्या आयुष्यात आली. त्यानंतर ३ वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी आता लग्नाचा निर्णय घेतला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com