Urfi Javed: आता तर कहरचं उर्फी म्हणाली, माझ्या बेडवर... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Urfi Javed

Urfi Javed: आता तर कहरचं उर्फी म्हणाली, माझ्या बेडवर...

अंतरंगी फॅशन फेम उर्फी जावेद नेहमीच कोणत्या कोणत्या कारणाने चर्चेत असतेच. उर्फी तिच्या विचित्र फॅशन स्टाइलमुळे तर कधी तिच्या स्पष्टवक्तेपणामुळे चर्चेत असते. त्याचबरोबर उर्फीचे व्हिडिओ आणि फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल होतात, ज्यासाठी तिला खूप ट्रोल देखील केले जाते.

सध्या उर्फी MTV Splitsvilla मध्ये धुमाकूळ घालताना दिसत आहे. यात उर्फी तिच्या बेडरूमच्या रहस्यांमुळे चर्चेत आली आहे. उर्फीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये ती बेडरुमशी संबंधित प्रश्नांची उत्तरे देताना दिसत आहे. या शोमध्ये उर्फी ला काही प्रश्न विचारले तर यावर तिने उघडपणे उत्तर दिलीत.

हेही वाचा- Sextortion: भारत ही सेक्सटॉर्शनची जागतिक राजधानी होतेय का

उर्फी जशी आपल्या फॅशनेबल कपड्यामध्ये बिंदास वावरते तशीच ती प्रश्नांचे उत्तरही पण बिनधास्त आहे. उर्फी जावेदचा हा व्हिडिओ स्प्लिट्सविलाच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट करण्यात आला आहे. यावेळी त्यांना एक एक करून अनेक प्रश्न विचारण्यात आले होते की, ''आर यू लाउड और क्वाइट एड बेड?' याला उत्तर देताना उर्फी म्हणाली, “आपण या गोष्टी बेडपर्यंतच ठेवल्या तर बरं होईल. तरीही तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही माझ्या बेडवर या आणि बघा, उर्फीला पुढचा प्रश्न विचारण्यात आला, "तू फसवणूक करणाऱ्या व्यक्तीसोबत राहशील का?" यावर उर्फीने उत्तर दिले, "मी त्याचा प्रायव्हेट पार्ट कापून टाकेन."

हेही वाचा: Urfi Javed video: उर्फीन सोडली लाज.. कपडे काढून थेट भिंतीवर..

उर्फी सध्या MTV Splitsvilla मध्ये दिसत आहे. या शोमध्ये देखील उर्फीची विचित्र फॅशन बघायला मिळत आहे‌ शोची होस्ट सनी लिओनही देखील उर्फीच्या फॅशनचे कौतुक करताना दिसते. शोमध्ये उर्फी कधी खूप रोमँटिक दिसते तर कधी ती एखाद्यावर भडकवतानाही दिसते. उर्फी या शोमधून खूप लाइमलाइट मध्ये येत आहे.